Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Traffic: आता पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; AI आधारीत प्रकल्पामुळे सुटणार ट्राफिक जामची समस्या

Pune Traffic: आता पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; AI आधारीत प्रकल्पामुळे सुटणार ट्राफिक जामची समस्या

Pune Traffic: वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांना लवकरच सुटकेचा श्वास मिळणार आहे. शहरातील तब्बल 500 सिग्नल चौकांवर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पावर 1100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ही महत्त्वाकांक्षी योजना पुढील तीन महिन्यांत सुरू होईल. या नव्या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांची संख्या, वेग, प्रवासाचा कालावधी आणि पीक अवरमधील वाहतुकीचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानुसार सिग्नल आपोआप बदलले जातील. यामुळे अनावश्यक थांबे कमी होऊन वाहतूक अधिक वेगाने आणि सुरळीतपणे सुरू राहील.

विशेष म्हणजे, सिग्नल सिंक्रोनायझेशनमुळे वाहनांना सलग हिरवा सिग्नल मिळण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ही प्रणाली राजकीय दौऱ्यांमुळे होणारी कोंडी कमी करण्यास मदत करेल. तसेच रुग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर त्वरित उपलब्ध करून देणेही शक्य होईल, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविणे सोपे जाईल.

हेही वाचा – महा उद्रेक…! सीना नदीला पूर, पुणे-सोलापूर महामार्ग बंद; लाखो हेक्टर शेती उद्ध्वस्त, राज्यातील सध्याची स्थिती काय?

आधीचा 102 कोटींचा प्रकल्प फसला

याआधी स्मार्ट सिटी अंतर्गत अ‍ॅडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) साठी 102 कोटी खर्चून 125 सिग्नल बसवण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी समस्या तशीच राहिली. त्यामुळे आता 1100 कोटींच्या नव्या प्रकल्पाकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, हा प्रकल्प पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!