Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कूपर रुग्णालयात HMIS चा प्रयोग! आता एका क्लिकवर मिळणार रुग्णालयातील सर्व माहिती

कूपर रुग्णालयात HMIS चा प्रयोग! आता एका क्लिकवर मिळणार रुग्णालयातील सर्व माहिती

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील व्यवस्थापन सुधारण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर आता रुग्णालयांतील विविध सेवा माहिती पालिकेच्या पोर्टल आणि चॅटबॉटद्वारे उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानुसार, कूपर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर सुरु केलेला आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) प्रयोग यशस्वी ठरल्यावर ही सुविधा अन्य रुग्णालयांमध्येही उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये नागरिकांना एका क्लिकवर रुग्णालयात उपलब्ध बेडची संख्या, बाह्यरुग्ण (ओपीडी) वेळापत्रक, रुग्णवाहिकांची उपलब्धता याबाबत माहिती मिळणार आहे.

दरम्यान, गुरुवारी कूपर रुग्णालयात झालेल्या संवादसत्रात महापालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघाडे आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय मोहिते उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर, इतर रुग्णालयातील सेवा सुविधा, मनुष्यबळ, झीरो प्रिस्क्रिप्शन योजना आणि भविष्यातील वैद्यकीय सेवा यावर चर्चा झाली.

हेही वाचा – Pune Traffic: आता पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; AI आधारीत प्रकल्पामुळे सुटणार ट्राफिक जामची समस्या

एचएमआयएस प्रणाली रुग्णालयातील रुग्णांचा डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण करते आणि प्रशासकीय निर्णय घेण्यास मदत करते. ही सॉफ्टवेअर प्रणाली रुग्णालयांच्या कामकाजात सुधारणा करते. तसेच ही प्रणाली केईएमसह इतर चार महापालिका रुग्णालयांतही प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे.

यासोबतच, कूपर रुग्णालयात येत्या तीन महिन्यांत किमोथेरपी सेंटर सुरू होणार आहे. नायर कॅन्सर रुग्णालयाच्या 10 मजली इमारतीत 6 मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण झाले असून, ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या सुधारणा महापालिका रुग्णालयांची कार्यक्षमता वाढवतील आणि नागरिकांना वेगवान, सुलभ आणि पारदर्शक सेवा मिळण्यास मदत करतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!