Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bhiwadi Fire: भिवाडीत काळीज पिळवटून टाकणारी घटना, केमिकल फॅक्टरीला भीषण आग; 7 कामगारांचा जिवंत जळून कोळसा

Bhiwadi Fire: भिवाडीत काळीज पिळवटून टाकणारी घटना, केमिकल फॅक्टरीला भीषण आग; 7 कामगारांचा जिवंत जळून कोळसा

Bhiwadi Fire : सोमवारी सकाळची वेळ भिवाडी औद्योगिक क्षेत्रासाठी काळ बनून आली. खुसखेडा येथील एका खासगी केमिकल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ७ कामगारांचा अत्यंत करुण अंत झाला. आगीची दाहकता इतकी प्रचंड होती की, बाहेर काढलेल्या मृतदेहांचे केवळ सांगाडे उरले असून त्यांची ओळख पटवणेही प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे.

नेमकी घटना काय?
खुसखेडा औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक G-1-118 B मधील कारखान्यात नेहमीप्रमाणे कामगार कामात व्यस्त होते. नऊच्या सुमारास अचानक आगीच्या ठिणग्या उडाल्या आणि पाहता पाहता संपूर्ण फॅक्टरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कारखान्यात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील रसायने साठवलेली असल्याने आगीने काही मिनिटांतच रौद्र रूप धारण केले. आगीचे लोळ इतके उंच होते की कित्येक किलोमीटर अंतरावरून धूर दिसत होता. सकाळी ९:२२ ला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, मात्र तोपर्यंत आगीने सर्व काही कवेत घेतले होते.

विदारक दृश्य आणि हानी:
अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जेव्हा पथकाने आत प्रवेश केला, तेव्हा तिथे केवळ मृत्यूचे थैमान पाहायला मिळाले. या घटनेत सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे शरीर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत अनेक कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

प्रशासनाची भूमिका आणि चौकशी:
या भीषण दुर्घटनेमुळे औद्योगिक वसाहतींमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. मात्र, कारखान्यात अग्निसुरक्षा नियम पाळले गेले होते का? याची सखोल चौकशी आता पोलीस आणि प्रशासन करत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!