Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर

CBSE 2026 Board Exams: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांमध्ये देशभरातून सुमारे 45लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत, आणि दोन्ही वर्गांसाठी स्वतंत्र नियमानुसार परीक्षा घेण्यात येणार आहेत.

या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची नवी संधी मिळणार आहे. यानुसार बोर्डाने निर्णय घेतला आहे की आता दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाईल. पहिली नियमित परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेत बसण्याची मुभा असेल. ज्या विद्यार्थ्यांना आपले निकाल समाधानकारक वाटणार नाही, त्यांना या दुसऱ्या संधीचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा – पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! 12 वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

तात्पुरत्या वेळापत्रकानुसार परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. हे वेळापत्रक सीबीएसईने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी तिथे भेट देणे गरजेचे आहे. 17 फेब्रुवारीला दहावीची परीक्षा गणित विषयाने सुरू होणार आहे. तर बारावीच्या परीक्षेला त्याच दिवशी सुरुवात होत असून बायोटेक्नॉलॉजी, आंत्रप्रेन्युअरशिप आणि शॉर्टहँड या विषयांचे पेपर प्रारंभी ठेवण्यात आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!