Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ISI गुप्तहेर वसीम अक्रमला भारतात अटक मात्र, फोटो पाकिस्तानी फास्ट बॉलरचे व्हायरल; सोशल मीडियावर क्रिकेटरचा संताप

ISI गुप्तहेर वसीम अक्रमला भारतात अटक मात्र, फोटो पाकिस्तानी फास्ट बॉलरचे व्हायरल; सोशल मीडियावर क्रिकेटरचा संताप

पलवल: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणामध्ये अटक केलेल्या युट्यूबरबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार वसीम अक्रमने स्पष्टीकरण दिले आहे. ‘वसीम अक्रम नावाच्या एका पाकिस्तानी गुप्तहेराला भारतात अटक करण्यात आली आहे. हरियाणातील पलवल येथील रहिवासी युट्यूबर वसीम अक्रम संपूर्ण पाकिस्तानमध्ये ट्रेंड करत आहे. त्याचे नाव वसीम अक्रम असल्याने, माजी पाकिस्तानी कर्णधार वसीम अक्रमच्या फोटोचा वापर करून असंख्य रील्स आणि व्हिडिओ बनवले जात आहेत. या व्हिडिओंमध्ये क्रिकेटर वसीम अक्रमला ट्रोल केले जात आहे.

 

यात काही वृत्तवाहिन्यांचादेखील समावेश आहे. माझा फोटो वापरत असल्याचं फास्ट बॉलर वसीम अक्रमने म्हटल आहे. वसीम अक्रमने सोशल मीडियावर याचा व्हिडिओही शेअर केला आहे.

 

काय म्हणाला वसीम अक्रम?

आपल्या शेजारील देशात एक गुप्तहेर पकडला गेला आहे, त्याचे नाव वसीम अक्रम आहे. न्यूज चॅनेल माझा फोटो पोस्ट करत आहेत. कोण लोक आहेत ही? कुठून आली आहेत? चेक नाही, बॅलन्स नाही, फक्त कमेंट्स करत आहेत. मला काही फरक पडत नाही, हे माझे अकाउंट नाही’, असं वक्तव्य वसीम अक्रमने केलं आहे.

6 दिवसांपूर्वी पलवलमध्ये गुप्तहेराला अटक

हरियाणातील पलवलमध्ये पोलिसांनी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) आणि त्यांच्या उच्चायुक्तालयासाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली वसीम अक्रम नावाच्या युट्यूबरला अटक केली. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अलिमेव गावातील रहिवासी तौफिकची चौकशी केल्यानंतर 26 सप्टेंबर रोजी ही अटक करण्यात आली.

सीआयए पलवलचे प्रभारी पीएसआय दीपक गुलिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पलवल जिल्ह्यातील कोट गावातील रहिवासी अक्रम हा युट्यूबर आहे जो युट्यूबवर मेवातच्या इतिहासाचे व्हिडिओ पोस्ट करत होता.

तो गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात होता आणि त्याने सिम कार्ड पुरवल्याचा आरोप आहे. वसीमचे वडील गावात एक रुग्णालय चालवतात आणि त्यांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत. पोलिसांनी अक्रमच्या फोनवरून अनेक गुन्हेगारी व्हॉट्सअॅप चॅट्स जप्त केले आहेत, त्यापैकी काही डिलीट करण्यात आल्या आहेत.

सापळ्यात कसा अडकला वसीम?

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की पलवल पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली तौफिकला अटक केली. तौफिकने अक्रमबद्दल माहिती दिली. 2021 मध्ये शेजारच्या देशात व्हिसासाठी अर्ज करताना अक्रम पाकिस्तानी एजंट दानिशच्या संपर्कात आला. अक्रमच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला असला तरी, चौकशीदरम्यान त्याच्या सीमापार संबंधांकडे लक्ष वेधणारी अनेक तथ्य समोर आले आहेत.

2022 पासून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप असलेल्या तौफिकने चौकशीदरम्यान अक्रमचे नाव उघड केले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अक्रम आणि तौफिक दोघेही इंटरनेट कॉलद्वारे आयएसआय आणि पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या संपर्कात होते. पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांनी पलवल गुन्हे शाखा आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे काम सोपवले आहे. गुप्तचर विभागही पोलिसांच्या संपर्कात आहे. येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

डिलीट चॅट परत मिळवण्याचं आव्हान

पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांच्या मते, त्याने पाकिस्तानला पाठवलेल्या संवेदनशील माहितीचा शोध घेण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून डिलीट केलेले चॅट्स परत मिळवले जात आहेत. वसीम दिल्लीलाही गेला आणि त्याने त्यांना सिम कार्ड दिले. तौफिकला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे, तर वसीमला चौकशीसाठी चार दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांच्या मते, वसीम एक यूट्यूब चॅनल चालवतो आणि मोकळ्या वेळेत त्याच्या वडिलांना रुग्णालयात मदत करतो. शहर पोलीस ठाण्यात तौफिकविरुद्ध दाखल केलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यात आता वसीमचे नाव जोडले गेले आहे. दरम्यान, वसीमच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की तो कधीही पाकिस्तानला गेला नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!