Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लँडिंग फेल, धावपट्टीवर विमानाचा थरकाप… अजितदादांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर काही तासांतच माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले

लँडिंग फेल, धावपट्टीवर विमानाचा थरकाप… अजितदादांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर काही तासांतच माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताच्या बातमीने संपूर्ण देश हादरला असतानाच, जयपूर विमानतळावर आणखी एक मोठी विमान दुर्घटना थोडक्यात टळली आहे. एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग फेल झाल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. विशेष म्हणजे, या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा प्रवास करत होते. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून रंधवा यांच्यासह सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

धावपट्टीला स्पर्श झाला अन् वैमानिकाने विमान पुन्हा हवेत झेपावले
एअर इंडियाचे ‘AI-1719’ हे विमान दिल्लीहून जयपूरसाठी निघाले होते. दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी विमान जयपूर विमानतळावर उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली. विमान धावपट्टीवर (Runway) टेकणार इतक्यात तांत्रिक बिघाड किंवा धावपट्टीवरील प्रतिकूल स्थितीमुळे विमानाचे संतुलन बिघडले. लँडिंग सुरक्षित होणार नाही हे लक्षात येताच वैमानिकाने अत्यंत वेगाने निर्णय घेतला आणि विमान पुन्हा हवेत उडवले (Go-Around).

१० मिनिटे हवेत घिरट्या अन् दुसऱ्या प्रयत्नात यश
पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. विमान तब्बल १० मिनिटे जयपूरच्या आकाशात घिरट्या घालत होते. अखेर सर्व तांत्रिक बाबी तपासून वैमानिकाने दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला आणि विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले. विमान जमिनीवर स्थिर होताच सुखजिंदर सिंह रंधवा यांच्यासह सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

काय असते ‘गो-अराउंड’ (Go-Around) प्रक्रिया?
विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा वैमानिकाला लँडिंगसाठी धावपट्टी सुरक्षित वाटत नाही किंवा काही तांत्रिक अडथळा येतो, तेव्हा जमिनीला स्पर्श करण्याच्या काही सेकंद आधी विमानाची गती वाढवून ते पुन्हा हवेत नेले जाते. या प्रक्रियेला ‘गो-अराउंड’ म्हणतात. जयपूरमध्ये वैमानिकाने हीच पद्धत वापरल्याने एका मोठ्या अपघाताची शक्यता मावळली. एकीकडे बारामतीत अजितदादांच्या विमानाचा स्फोट होऊन राज्याने आपला लाडका नेता गमावला असतानाच, जयपूरमधील या घटनेने व्हीआयपी सुरक्षा आणि विमान प्रवासातील तांत्रिक बाबींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!