उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ते बारामतीच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते बारामती तालुक्यात एकूण चार सभा घेणार होते. परंतु बारामतीतील विमानतळावर लँडिंग होत असतानाच त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवारांच पार्थिव आता विद्या प्रतिष्ठानकडे रवाना करण्यात आल आहे. त्यांच्या शववाहिनीच्या चहूबाजूने कार्यकर्ते, चाहत्यांचा प्रचंड आक्रोश पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते बारामतीत जमले असून अनेक बड्या नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंबीयदेखील बारामतीत दाखल झाले आहे.
कुटुंबासाठी हा मोठा धक्का
अजित पवार यांच्या पार्थिवावर 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना बारामती तालुक्यात एकूण चार सभा घेणार होते. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी धुक्यामुळे विमानाच क्रॅश लँडींग झाल आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. कारण वृद्धत्वामुळे एकीकडे शरद पवार सक्रीय राजकारणातून पाय काढत असताना अजित पवारांचं अकाली निधन हे फाक दुख:द आहे. सगळ्याच्या मनाला चटका लावणारी ही घटना आहे. राष्ट्रवादीला राजकीय पातळीवर सावरण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे.
लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला
अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभर अजित पवारांच्या समर्थकांनी विमान दुर्घटनास्थळी, रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. कोणालाही विश्वास बसणार नाही अशी घटनाच आज घडली होती. संध्याकाळी 7.30 च्या सुमारास त्यांच पार्थिव रुग्णालयातून बाहेर काण्यात आलं. त्याच्यासह लाखोंच्य संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहे. दादा परत या…., आमचा देव गेला…, आमच्या देवाऱ्यातून देव गेला…, अजित पवार अमर रहे, अशा घोषणा आणि आक्रोश चाहते करत आहेत. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र आणि बारामती पोरकी झाल्याचं नागरिक बोलत आहेत.
पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार
अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजितदादांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
एक कर्तृत्ववान व्यक्तीला महाराष्ट्र मुकला
हा अपघाती मृत्यू महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्ववान निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला. जे काही नुकसान झालं ते भरुन निघणारं नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा अपघात यामागे काही राजकारण आहे अशाप्रकारची भूमिका मांडली गेली. याच्यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपा करुन इथं राजकारण आणू नये, अशा शब्दात शरद पवारांनी अपघातावर प्रतिक्रिया दिली.


