Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Shetty : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हे शाखेने आवळल्या मुख्य शस्त्र पुरवठादाराच्या मुसक्या

Rohit Shetty : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हे शाखेने आवळल्या मुख्य शस्त्र पुरवठादाराच्या मुसक्या

Rohit Shetty Firing Case : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकRohit Shetty, Firing Case, Mumbai Crime Branch, Weapon Supplier Arrested, Shubham Lonkar, रणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यासाठी लागणारे प्राणघातक शस्त्र पुरवणारा मुख्य सूत्रधार आसाराम फसले उर्फ ‘बाबू’ याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तपासातील महत्त्वाचे धागेदोरे
शस्त्र पुरवठादाराची अटक: तपासात समोर आले आहे की, बाबूनेच या हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल उपलब्ध करून दिले होते. त्याला आज मुंबईतील एस्प्लेनेड न्यायालयात (किल्ला कोर्ट) हजर केले जाणार असून, त्याच्याकडून शस्त्रांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

पुणे कनेक्शन उघड
हल्लेखोरांनी गुन्ह्यासाठी वापरलेली स्कूटर ३ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी जप्त केली होती. ही स्कूटर पुण्यातील एका व्यक्तीकडून ३० हजार रुपयांत विकत घेण्यात आली होती. आरोपी आदित्य गायकवाड आणि समर्थ पोमाजी यांनी ही गाडी जुहू परिसरात आणून ठेवली होती.

‘मास्टरमाईंड’ शुभम लोनकरची विचित्र कार्यपद्धती
या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार फरार आरोपी शुभम लोनकर असल्याचे समोर आले आहे. लोनकरची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत ‘प्रोफेशनल’ आहे. गाडी खरेदी करणारे, शस्त्र पुरवणारे आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारे अशा वेगवेगळ्या गटांचा त्याने वापर केला. विशेष म्हणजे, गाडी मुंबईत आणणाऱ्या आरोपींना प्रत्यक्ष नेमबाज (Shooter) कोण आहे, याची पुसटशी कल्पनाही नव्हती. ठराविक ठिकाणाहून गाडी उचलणे आणि गोळीबार करून पसार होणे, अशा स्पष्ट सूचना लोनकरने नेमबाजाला दिल्या होत्या.

नेमबाज अजूनही ‘आउट ऑफ पोहोच’
बाबूच्या अटकेमुळे पोलिसांना मोठे यश मिळाले असले तरी, रोहित शेट्टी यांच्या घरावर प्रत्यक्ष गोळी झाडणारा नेमबाज अद्याप फरार आहे. पोलीस पथके विविध राज्यांत छापे टाकत असून, या घटनेमागे एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीचा किंवा बड्या गँगस्टरचा हात आहे का, याचा कसून तपास केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!