Today शनिवार, 8th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर; खात्यात येणार थेट 4000 रुपये

PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर; खात्यात येणार थेट 4000 रुपये

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केली जाते. केंद्र सरकारतर्फे ही योजना राबवली जाते. केंद्र सरकार एका वर्षात 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना ही मदत करते. प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवले जातात. आता लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कारण यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 नव्हे तर तब्बल 4000 रुपये मिळणार आहेत. हे पैसे नेमके कसे मिळणार आहेत? तसेच चार हजार रुपयांची मदत मिळण्यास कोणते शेतकरी पात्र आहेत, हे पाहूत.

थेट मिळू शकतात 4000 रुपये
याआधी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 19 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवण्यात आले होते. हा शेतकऱ्यांना मिळालेला 21 वा हप्ता होता. त्यानंतर आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला असला तरीही शेतकऱ्यांना अजूनही 22 वा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे या हप्त्याची शेतकरी वाट पाहात आहेत. असे असताना आता मोठी माहिती मिळत आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांना यावेळी 2000 रुपयांऐवजी थेट 4000 रुपये मिळणार आहे. याआधीचा ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. तसेच अर्जामध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांना 21 वा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे यावेळी ज्या शेतकऱ्यांनी अर्जातील त्रुटी दूर केलेली आहे, तसेच ज्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना थेट 4000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

तर तुम्हाला मिळणार नाहीत पैसे
सूत्रांच्या माहितीनुसार यावर्षी होळी सणाच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22 वा हप्ता पाठवला जाणार आहे. म्हणजेच 4 मार्च 2026 च्या अगोदरच शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये मिळू शकतात. तसं पाहायचं झालं तर अद्याप सरकारने 22 वा हप्ता कधी मिळणार, याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी ती प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

या बसेसमध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल असं एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर गेल्या 23 तासां पेक्षा जास्त वेळापासून ट्राफीक जामची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला होता. त्यानंतर टँकरमधील प्रोपलिन गॅस लिक झाला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!