Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune: संतापजनक! न्यायाच्या प्रतिक्षेत 27 वर्षे कोर्टात हेलपाटे; जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून अखेर दिला जीव

Pune: संतापजनक! न्यायाच्या प्रतिक्षेत 27 वर्षे कोर्टात हेलपाटे; जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून अखेर दिला जीव

पुणे : आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव नामदेव जाधव असून ते पुण्यातील वडकी भागात राहत होते. गेल्या तब्बल २७ वर्षांपासून त्याचा जमीनीसंदर्भात खटला कोर्टात सुरू होता. मात्र न्याय न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या नामदेव यांनी आज जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली. या घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादासंदर्भात त्यांची केस पुणे जिल्हा न्यायालयात गेल्या २७ वर्षांपासून प्रलंबित होती. मात्र, इतक्या वर्षांच्या सुनावणीनंतरही न्याय मिळत नसल्याने ते अत्यंत नैराश्यात होते. अखेर आज सकाळी नामदेव जाधव न्यायालयात हजर झाले होते. मात्र, काही वेळानंतर त्यांनी अचानक कोर्टाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

प्राथमिक चौकशीतून हे स्पष्ट झाले आहे की, न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे आणि खटला दीर्घकाळ चालत राहिल्याने जाधव मानसिक तणावाखाली होते. “२७ वर्षांपासून न्यायालयाचे चक्कर मारूनही काही निर्णय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, आत्महत्येपूर्वी जाधव यांनी कोणतंही पत्र किंवा संदेश लिहिला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!