Today मंगळवार, 4th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Police: नीलेश घायवळच्या साथीदारवर पुणे पोलिसांची कारवाई; संतोष धुमाळवर ‘मकोका’ कारवाई

Pune Police: नीलेश घायवळच्या साथीदारवर पुणे पोलिसांची कारवाई; संतोष धुमाळवर ‘मकोका’ कारवाई

पुणे: कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा जवळचा साथीदार गुंड संतोष धुमाळ याच्याविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. धुमाळ याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे २१ गुन्हे दाखल आहेत.

कोथरूड गोळीबार प्रकरणात नीलेश घायवळसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे शुक्रवारी आदेश दिले. नीलेश घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्धमकोका’ कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी घायवळचा जवळचा साथीदार संतोष धुमाळ याच्याविरुद्धमकोका’ कारवाई करण्याचे आदेश दिले. धुमाळ मुळशी तालुक्यातील आहे. सध्या तो कोथरूड भागात वास्तव्यास आहे.

गोळीबार प्रकरणात मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करण्यात आली. घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवले असून, सध्या तो युराेपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनीलूक आऊटनोटीस बजाविली आहे.

घायवळ याचे पारपत्र रद्द करण्याची विनंती पोलिसांनी शुक्रवारी विशेष न्यायालयाकडे केली. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी नीलेश घायवळ याच्यासह पिस्तूल परवान्यावरून चर्चेत असलेला त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यासह इतर सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घायवळविरुद्ध आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड गोळीबार प्रकरण, वाहनाचा बनावट क्रमांक, बेकायदा शस्त्र बाळगणे, बनावट पारपत्र प्रकरण, खंडणी असे गंभीर गुन्हे घायवळविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!