Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Samruddhi Mahamarg Block : समृद्धी महामार्गावर 4 दिवस मेगाब्लॉक! उद्यापासून ‘या’ वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद; प्रवासापूर्वी पहा ‘हे’ वेळापत्रक

Samruddhi Mahamarg Block : समृद्धी महामार्गावर 4 दिवस मेगाब्लॉक! उद्यापासून ‘या’ वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद; प्रवासापूर्वी पहा ‘हे’ वेळापत्रक

Samruddhi Mahamarg Block : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महामार्गावर अत्याधुनिक ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (HTMS) कार्यान्वित करण्यासाठी उद्या, ३१ जानेवारीपासून ते ३ फेब्रुवारीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ठराविक टप्प्यांवर वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिली आहे.

नेमके कारण काय?
महामार्गावरील वाहतूक शिस्तबद्ध व्हावी आणि वेगावर नियंत्रण राहावे, यासाठी ‘गँट्री’ (पोलादी सांगाडे) उभारले जात आहेत. या यंत्रणेवर खालील अत्याधुनिक सोयी असतील:

  • नंबर प्लेट ओळख: स्वयंचलित कॅमेऱ्यांद्वारे गाड्यांच्या नंबर प्लेट टॅप करणे.
  • वेग नियंत्रण: ओव्हरस्पीडिंग रोखण्यासाठी आधुनिक वेगमापक यंत्रे.
  • रीअल-टाइम अपडेट्स: डिजिटल बोर्डद्वारे प्रवाशांना हवामान आणि वाहतुकीची माहिती देणे.

ब्लॉकचे वेळापत्रक: कुठे आणि कधी रस्ता बंद?
३१ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत महामार्गावर पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाहतूक थांबवण्यात येईल:

वर्धा तालुका : दु. 12 ते 1, दु. 3 ते 4 (नागपूरकडे येणारा).
सेलू तालुका : दु. 12 ते 1 (मुंबईकडे जाणारा).
सेलू तालुका : दु. 3 ते 4 (नागपूरकडे येणार).
हिंगणा तालुका : दु. 12 ते 1 (नागपूरकडे येणारा).
हिंगणा तालुका : दुपारी 3 ते 4 (मुंबईकडे जाणारा).
आर्वी तालुका : दुपारी 3 ते 4 (मुंबईकडे जाणारा)

प्रवाशांना आवाहन
पुढील चार दिवस नागपूर, हिंगणा, सेलू, वर्धा आणि आर्वी या पट्ट्यात गँट्री उभारणीचे काम १४ टप्प्यांत चालणार आहे. कामाच्या वेळी संबंधित मार्गिका ६० मिनिटांपर्यंत पूर्णतः बंद ठेवली जाणार असल्याने, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या वेळापत्रकाचा विचार करूनच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!