Mama Pagare News: डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ ‘मामा’ पगारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साडी नेसलेल्या अवस्थेतील मॉर्फ केलेला व्हिडिओ फेसबुकवर शेअर केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी जबरदस्तीने साडी नेसवली.
पगारे यांनी सोमवारी संबंधित व्हिडिओ पोस्ट करत ‘माफ करा मुलींनो, मलाही ट्रेंडमध्ये राहायचे आहे,’ असे कॅप्शन दिले होते. हा व्हिडिओ लोकप्रिय मराठी गाण्यावर आधारित होता. मात्र, या पोस्टवर भाजपच्या कल्याण जिल्हा युनिटकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांनी पगारे यांनी पंतप्रधानांचा अपमान केला आरोप केला.
मुंबई से सटे कल्याण में कांग्रेस नेता मामा पगारे ने पीएम मोदी का साड़ी वाला फोटो वायरल किया तो कल्याण भाजपा ने साड़ी पहनाकर दिया जवाब #Maharashtra #MaharashtraCongress #BjpMaharashtra pic.twitter.com/zMAREXoXJU
— Vinod Jagdale (@iamvinodjagdale) September 23, 2025
यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पगारे यांच्याविरोधात प्रतीकात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पगारे हे डोंबिवली (पूर्व) येथील मानपाडा रोड परिसरात नेहमी सकाळी वेळ घालवतात, अशी माहिती मिळाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, मंडळ अध्यक्ष करण जाधव, संदीप माळी आणि दत्ता मालेकर यांच्यासह पदाधिकारी तेथे पोहोचले. या वेळी कार्यकर्त्यांनी पगारे यांना घेरले आणि त्यांना जबरदस्तीने साडी नेसवली.


