Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

71st National Film Awards: शाहरुख खानला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार; जाणून घ्या संपूर्ण विजेत्यांची यादी

71st National Film Awards: शाहरुख खानला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार; जाणून घ्या संपूर्ण विजेत्यांची यादी

71st National Film Awards: 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा भव्य सोहळा 23 सप्टेंबर 2025 रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वर्षी शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांना त्यांच्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, तर दक्षिण भारतीय सुपरस्टार मोहनलाल यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान, दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.

शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला, तर विक्रांत मेस्सी ‘12 वी फेल’ चित्रपटासाठी सन्मानित झाला. राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, बाल कलाकार, मराठी तसेच इतर भाषांतील दिग्दर्शक, निर्माता, गायक आणि कलाकारांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. तसेच, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंट यांना ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ मधील ‘धिंडोरा बाजे रे’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन पुरस्कार मिळाला.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी शाहरुखच्या दिल्ली थिएटर ते जागतिक स्टारडमपर्यंतच्या प्रवासाचे कौतुक केले. पुरस्कार स्वीकारताना शाहरुख खूपचं खूश दिसला. त्याने प्रेक्षकांचे आभार मानले. या भव्य सोहळ्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत कलाकारांचा गौरव केला गेला आणि त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!