मुंबई : गायक कुमार सानू यांच्या वैयक्तिक जीवनाची सध्या चर्चा सुरु आहे. सानू यांची एक्स पत्नी रिटा भट्टाचार्य यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुमार सानूसोबतच्या त्यांच्या नात्याची आठवण करून देताना रिटा भावूक झाल्या. त्यांनी भावनिक होऊन गरोदरपणात त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप केला.
रिटा यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘मला हे सांगायला लाज वाटत नाही की, या लोकांना स्वतःचा आदर नाही. आज माझा मुलगा खूप मोठा झाला आहे. देव सर्वांना आशीर्वाद देवो. तो त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करतो. तो नेहमी विचारतो, ‘बाबा कुठे आहेत? मला बाबांकडे जायचे आहे’, असे म्हणत रिटा यांना आश्रू अनावर झाले. कुमार सानू याने माझ्या आणि माझ्या तीन मुलांचे आयुष्य उद्धवस्त केले. रिटा यांनी कुमार सानूवर अनेक विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही केला’.
कुमार सानू यांच्या एक्स पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. ‘जगाला त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल माहिती नाही. कुमार सानू कुनिकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. रिटा भट्टाचार्य यांनी पुढे म्हटले की, आज सर्वांना ऐकायला मिळत आहे की, त्यांचे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणावर तरी प्रेमसंबंध होते. याचे सत्य उघड करणे आता गरजेचे बनले आहे.


