Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळणार, योजनेची रक्कम महिला व बालविकास विभागाकडे जमा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळणार, योजनेची रक्कम महिला व बालविकास विभागाकडे जमा

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतूरतेने वाट पाहत आहेत. त्याचं वितरण लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग केले आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींना लवकरच सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम शासनाकडून दिली जाईल.

महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत 14 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळाली आहे. याकाळात अनेक लाडक्या बहि‍णींना या योजनेतून बगळण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आल होत. आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. याच हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 410 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींनाकेवायसी करावी लागणार

महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करताना महत्त्वाचा निकष ठेवला होता, तो निकष म्हणजे ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्याच कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरतील. आता लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचं उत्पन्न निकषाप्रमाणं आहे की नाही हे शोधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार सर्व लाडक्या बहिणींनाकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या ई केवायसी प्रक्रियेत लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार कार्डची पडताळणी करावी लागेल. याशिवाय पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची देखील पडताळणी करणं आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया दोन महिन्यांमध्ये पूर्ण करायची आहे. अटीतबसणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या घटणार असं चित्र आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!