Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दुर्दैवी घटना! उंच इमारतीवरुन वीट कोसळून 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू; पहिलीच नोकरी ठरली शेवटची

दुर्दैवी घटना! उंच इमारतीवरुन वीट कोसळून 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू; पहिलीच नोकरी ठरली शेवटची

मुंबई : जोगेश्वरी पूर्वेला बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगमधून सिमेंट वीट खाली पडून 22 वर्षीय तरुणीचा जागीच (Accident) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उंचच उंच इमारतींचे मनोरे असलेलं मुंबई (Mumbai) शहर इतरांना मायानगरी वाटतं. मुंबईच्या इमारतींकडे पाहून अनेक लोक त्यांची स्वप्नपूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल होतात. मात्र, या उंच इमारती अनेकदा धोक्याची घंटा ठरतात. कधी उंच इमारतीवरुन अपघात होतात, तर कधी आगीच्या घटनांनी अग्निशमन दलाची मोठी धावाधाव होते. मात्र, निर्माणधीन इमारतीच्या (Building) कामामुळे एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील जोगेश्वरी परिसरात घडली.

जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात सकाळी 9:30 च्या सुमारास नव्या नोकरीत कामासाठी जात असलेल्या 22 वर्षीय संस्कृतीच्या डोक्यावर उंच निर्माणाधीन इमारतीवरुन सिमेंट ब्लॉक पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, स्थानिकांनी धावाधाव करत संस्कृतीला रिक्षातून रुग्णालयात नेले, मात्र उंचीवरुन वीट पडल्याने मार जोरात लागला होता. त्यामुळे मोठा रक्तश्राव झाला. रक्त मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव रुग्णालयात पाठवले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मुलीच्या वडिलांची पोलिसांत फिर्याद

मृत मुलीचे वडिल अनिल उमेश अमिन (वय ५६ वर्षे) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते जोगेश्वरी पूर्व येथे पत्नी सुप्रिया, आई पद‌मावती, मुलगी संस्कृती, (वय २२ वर्षे), आणि भाची निशीता बेमेरा यांच्यासोबत राहतात. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय असून मुलगी संस्कृती हिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलेला असून सध्या गेल्या 4-5 दिवसांपासून RBL बँक, गोरेगाव (प.) मुंबई या ठिकाणी कामाला जात होती. तिची कामावर जाव्याची वेळ सकाळी 9.30 ते 6.20 एवढी होती.

संस्कृती नेहमीप्रमाणे सकाळी 9.30 वा. घरातून कामावर जाण्यास निघाली. त्यावेळेस, ते घरी नाश्ता करत होते. त्याचवेळी बाहेरून जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने ते बाहेर आले. बाहेर गर्दी जमली होती. त्यावेळी गर्दीतून ते पुढे गेले असता, त्याना संस्कृती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसली. तिच्या डोक्यावर जोरात मार लागल्याने भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे दिसले. त्यानंतर, तिला तात्काळ जवळील रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!