Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

मुंबई: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

पशुसंवर्धनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती देण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या सात महसुली विभागातील ३४ जिल्ह्यात एकूण ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. नवीन इमारत बांधण्याकरिता २८७ कोटी ७६ लाख ४४ हजार तर दुरुस्तीसाठी १२१ कोटी ११ लाख ८२ हजार, स्वच्छतागृह साठी २५ कोटी १७ लाख २० हजार, विविध उपकरणे खरेदीसाठी २४ कोटी ३५ लाख ८८ हजार असा एकूण ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ही सर्व कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत.

बीड जिल्ह्यात २४ इमारतीसाठी ९ कोटी ४० लाख

बीड जिल्ह्यात सर्व सहा विधानसभा मतदारसंघात २४ इमारतींसाठी ९ कोटी ४० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत, त्यांची विभागनिहाय संख्या पुढील प्रमाणे- मुंबई विभाग – ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३, पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात १२५, नाशिक विभाग – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात ५५, छत्रपती संभाजीनगर विभाग – छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात ५१, लातूर विभाग- लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात ३९, अमरावती विभाग- अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात ३८, नागपूर विभाग- नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात ३६ अशा एकूण ३५७ ठिकाणी नवीन इमारतींसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!