PAN Card Update: जर तुम्ही अद्याप पॅन कार्ड (PAN Card) काढले नसेल, तर तुमच्याकडे केवळ ३१ मार्च २०२६ पर्यंतचीच वेळ आहे. १ एप्रिलपासून पॅन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक कडक होणार असून, केवळ आधार कार्डच्या जोरावर पॅन कार्ड मिळवण्याची सुविधा कायमची बंद होणार आहे. ‘CSCeGov’ ने सोशल मीडियाद्वारे या महत्त्वपूर्ण बदलाची माहिती दिली आहे.
नेमका बदल काय?
सध्या नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करताना फक्त आधार कार्ड दिले तरी चालते. मात्र, १ एप्रिल २०२६ पासून प्राप्तिकर विभागाने नवीन अट लागू केली आहे. आता आधार कार्डसोबत जन्मतारखेचा अधिकृत पुरावा (Proof of Date of Birth) जोडणे अनिवार्य असेल. ३१ मार्चनंतर जुन्या पद्धतीचे (केवळ आधार असलेले) अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
१ एप्रिलपासून ‘या’ कागदपत्रांची पडणार गरज
१ एप्रिलनंतर पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार व्यतिरिक्त खालीलपैकी किमान एक कागदपत्र सोबत ठेवावे लागेल:
जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
- १० वीची गुणपत्रिका किंवा बोर्ड सर्टिफिकेट
- मतदार ओळखपत्र (Voter ID) किंवा पासपोर्ट
- वाहन परवाना (Driving License)
- मॅजिस्ट्रेटने प्रमाणित केलेले प्रतिज्ञापत्र
३१ मार्चपूर्वी अर्ज करणे का फायदेशीर?
किमान कागदपत्रे: सध्या फक्त आधार कार्डवर आधारित e-KYC मुळे कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे अपलोड करावी लागत नाहीत.
- वेळेची बचत: कागदपत्रांच्या कटकटीशिवाय प्रक्रिया जलद पूर्ण होते.
- सुटसुटीत पद्धत: आधारवरील फोटो आणि पत्ता आपोआप घेतला जात असल्याने अर्ज भरणे सोपे जाते.
ऑनलाइन अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
तुम्ही घरबसल्या NSDL च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकता:
- वेबसाइट: NSDL पोर्टलवर जाऊन ‘New PAN – Indian Citizen (Form 49A)’ निवडा.
- माहिती: नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरून नोंदणी करा.
- टोकन नंबर: अर्ज सबमिट केल्यावर मिळणारा ‘टोकन नंबर’ जपून ठेवा.
- प्रमाणीकरण: आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP द्वारे e-KYC पूर्ण करा.
- पेमेंट: अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर तुमची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होईल.


