Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Student Suicide: पुण्यात AI चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; मृत्यूपूर्वी मोबाईलमधील डेटा केला नष्ट

Pune Student Suicide: पुण्यात AI चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; मृत्यूपूर्वी मोबाईलमधील डेटा केला नष्ट

Pune Student Suicide: पुण्यातील दिघी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, 19 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. अथर्व विजय देशमुख असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो वाघोली येथील एका नामांकित महाविद्यालयात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) या विषयात पदवीचे शिक्षण घेत होता. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तरुण विद्यार्थ्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सर्वजण सुन्न झाले आहेत.

आई घराबाहेर असताना उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व आपल्या आईसोबत दिघीतील गंगोत्री रुग्णालयाजवळ एका भाड्याच्या खोलीत राहत होता. रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास त्याची आई कामानिमित्त घराबाहेर गेली असताना ही घटना घडली. अथर्वने स्वयंपाकघरात सीटबेल्टचा वापर करून गळफास लावून घेतला. त्याची आई घरी परतल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने खिडकीवाटे आत प्रवेश केला असता, अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाला या स्थितीत पाहून त्याच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

मोबाईल डेटा नष्ट केल्याने गुढ वाढले
दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, एक अत्यंत संशयास्पद आणि महत्त्वाची बाब समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अथर्वने आपला मोबाईल फोन पूर्णपणे ‘फॉर्मेट’ करून त्यातील सर्व डेटा नष्ट केला होता. त्याने हे पाऊल नेमके का उचलले आणि मोबाईलमधील माहिती का पुसून टाकली, याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने त्यातील माहिती पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
घटनेनंतर अथर्वला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अभ्यासात हुशार असलेल्या आणि भविष्यातील महत्त्वाच्या अशा AI तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने असे पाऊल का उचलले, याचे गुढ अद्याप कायम आहे. दिघी पोलीस सध्या देशमुख कुटुंबातील सदस्य, त्याचे मित्र आणि महाविद्यालयीन सहकाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!