Today सोमवार, 21st सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मंत्री-अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन मर्यादा जाहीर; किती लाखांपर्यंत कार खरेदी करू शकतात? जाणून घ्या

मंत्री-अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन मर्यादा जाहीर; किती लाखांपर्यंत कार खरेदी करू शकतात? जाणून घ्या

Govt Vehicle Procurement Rules: महाराष्ट्र सरकारने शासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या वाहन खरेदीसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली 17 सप्टेंबर 2025 पासून लागू झाली असून, याआधी जारी केलेले सर्व जुने आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाढती उत्पादनखर्च, महागाई आणि बीएस-6 मानकांच्या नवीन वाहनांच्या किमती या निर्णयामागील मुख्य कारणे असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. नवीन आदेशानुसार, अधिकारी आणि मंत्र्यांच्या वाहन खरेदीसाठी पदानुसार किमतीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यात जीएसटी, वाहन कर आणि नोंदणी शुल्काचा समावेश नाही. या नियमावलीनुसार,

  • राज्यपाल, मुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना कोणतीही किमतीची मर्यादा नाही.
  • मंत्री, मुख्य सचिव: 30 लाखांपर्यंत
  • अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव: 25 लाखांपर्यंत
  • राज्य माहिती आयुक्त, लोकसेवा आयोगाचे सदस्य: 20 लाखांपर्यंत
  • राज्यस्तरीय विभागप्रमुख, आयुक्त, महानिदेशक, विभागीय आयुक्त: 17 लाखांपर्यंत
  • जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक: 15 लाखांपर्यंत
  • इतर अधिकारी (राज्य वाहन पुनरावलोकन समिती मंजुरीनुसार): 12 लाखांपर्यंत

दरम्यान, शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष प्रोत्साहन दिले आहे. EV Policy-2025 अंतर्गत, अधिकारी त्यांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा 20 टक्के जास्त किमतीपर्यंत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकतात. तसेच, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित फील्ड ऑफिसर्सना 12 लाखांपर्यंत मल्टी युटिलिटी वाहन (MUV) खरेदी करण्याची मुभा असेल.

हेही वाचा – मराठा समाजासाठी दिलासादायक निर्णय! मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका

नवीन नियमांनुसार, नवीन वाहन खरेदी करण्यापूर्वी महावाहन प्रणालीत जुने वाहन अधिकृतरीत्या स्क्रॅप घोषित करणे अनिवार्य आहे. हा आदेश फक्त शासकीय विभागापुरता मर्यादित नसून सर्व स्वायत्त संस्था, सरकारी कंपन्या, मंडळे आणि महामंडळांनाही लागू होईल. या नव्या नियमामुळे सरकारी वाहन खरेदी प्रक्रिया पारदर्शक होईल आणि तांत्रिक तसेच पर्यावरणीय निकषांसह सुसंगत गाड्यांची खरेदी शक्य होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!