Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘आम्ही अडाणी, तिनं आम्हाला काहीच सांगितलं नाही’; मृत महिला डॉक्टरच्या वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश

‘आम्ही अडाणी, तिनं आम्हाला काहीच सांगितलं नाही’; मृत महिला डॉक्टरच्या वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आपले जीवन संपवले. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेने सरकार मोठ्या अडचणीत आले आहे. कारण, महिला डॉक्टरने आरोपीच्या कठड्यात पोलीस प्रशासन, राजकीय नेते उभे केले आहे. मृत महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. महिलेने आत्महत्या करताना पोलिसाने अत्याचार केल्याचे हातावर लिहिले होते. आत्महत्येची माहिती मिळताच वडिलांना धक्का बसला आहे. घर आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होते. मृत महिला डॉक्टरला दोन भाऊ आहेत पण ते तिच्यापेक्षा लहान आहेत.

मृत महिला डॉक्टर दोन वर्षापासून मेडिकल ऑफिस सर म्हणून काम करत होती, मागच्या वर्षभरापासून तिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा मोठा दबाव होता. राजकीय नेत्यांच्या आणि पोलिसांच्या सांगण्यावरून पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करायचा, रुग्णालयात घेऊन न येता त्यांना फिटनेस, अनफिटनेस सर्टिफिकेट देण्याचा दबाव होत होता. तिने टोकाचे पाऊल उचलण्याआधी जी हातावर नावे लिहिली आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.

वडील म्हणाले, या घटनेविषयी आम्हाला सकाळी 8 वाजता माहिती मिळाली. महिला डॉक्टरने जळगावात शिक्षण केले होते. त्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून फलटण उपजिल्हा रुग्णालयात दीड वर्षापासून कार्यरत होती. आम्हाला कधीच तिने काही सांगितले नाही. आम्हाला दोनतीन दिवसातून तिचा फोन यायचा पण तिने आम्हाला काहीच सांगितले नाही. आम्ही अडाणी आम्हाला काहीच माहित नाही. शेवटचा फोन दिवाळीच्या आधी झाला होता. दिवाळीला येण्यासाठी सुट्टी नाही त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर येईल. महिलेला दोन भाऊ होते, ती मोठी होती.

चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या केलीय. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहीलंय. पोलीस निरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच पोलीस प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

हातावरील सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

गुरूवारी 23 तारखेला रात्री आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. महिलेने त्यांच्या हातावर आत्महत्या करण्याचे कारण तळहातावर लिहिले होते. ज्यात त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिल्याचे नमुद केले आहे. महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन ‘माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन’ असा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने, अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!