Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘सरपंच-ग्रामसेवक युतीच्या हिशोबा’साठी सरकारचे तगडे पाऊल; राज्यातील ग्रामपंचायतींसाठी आता स्वतंत्र ‘वेबसाईट’

‘सरपंच-ग्रामसेवक युतीच्या हिशोबा’साठी सरकारचे तगडे पाऊल; राज्यातील ग्रामपंचायतींसाठी आता स्वतंत्र ‘वेबसाईट’

Digital Gram Panchayat: महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचा कारभार आता पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक होणार आहे. ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी नवीन वेबसाइट विकसित करण्याचे आदेश दिले असून, या वेबसाइटद्वारे प्रत्येक गावाचा इतिहास, संस्कृती आणि आर्थिक व्यवहार थेट जनतेसमोर येणार आहेत.

प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वेबसाइट

राज्यात अनेक ग्रामपंचायतींनी सूचना देऊनही वेबसाइट विकसित करण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता ग्रामविकास विभागाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला आपली स्वतंत्र वेबसाइट तयार करावी लागणार असून, त्या माध्यमातून गावाचा जमा-खर्च, विकास प्रकल्प, नागरिक सेवा आणि तक्रार निवारण या सर्व बाबी ऑनलाइन प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

हेही वाचा –Devendra Fadnavis : महायुती की स्वबळ? स्थानिक निवडणुकीचा निर्णय जिल्हाध्यक्षांवर; फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

१७ सप्टेंबरपासून अभियानास प्रारंभ

राज्यात हे अभियान १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाले असून, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राबवले जाणार आहे. या मोहिमेत राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना एकूण २४५ कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. अलीकडील बैठकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि प्रधान सचिव यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

वेबसाइटमध्ये १३ महत्त्वाचे घटक

या वेबसाइटवर ग्रामपंचायतींच्या सर्व बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. मुख्यपृष्ठ, ग्रामपंचायतीबद्दल माहिती, प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम, योजना व लाभार्थी, अर्थसंकल्प, पायाभूत सुविधा, नागरिक सेवा, शिक्षण, युवक कोपरा, पर्यावरण, शाश्वत विकास आणि तक्रार निवारण अशा १३ घटकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा संपूर्ण कारभार ऑनलाइन होणार आहे.

गावाचा इतिहास आणि संस्कृतीही जगासमोर

दरम्यान, आता प्रत्येक वेबसाइटवर त्या गावाचा इतिहास, पारंपरिक कलाकृती, लोककला, मंदिरे, पर्यटनस्थळे, मान्यवर व्यक्ती आणि स्वातंत्र्यसैनिकांची माहिती दिली जाणार आहे. तसेच गावातील स्थानिक उत्पादने, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि सांस्कृतिक ओळख हेसुद्धा वेबसाइटवर मांडले जाणार आहे. यामुळे प्रत्येक गावाची वेगळी ओळख राज्य आणि देशपातळीवर निर्माण होईल.

पारदर्शकतेसाठी प्रभावी माध्यम

ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, ही वेबसाइट केवळ माहितीपुरती नसून ती ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आरसा ठरणार आहे. राज्य सरकारकडून ग्रामविकासासाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा योग्य वापर आणि परिणाम आता थेट ऑनलाइन पाहता येणार आहे. ग्रामविकास विभागाकडून वेबसाइट विकसित करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. ग्रामपंचायतींनी माहितीपूर्ण आणि प्रभावी वेबसाइट तयार करून गावाचा विकास सर्वांसमोर मांडावा, असे निर्देश दिले आहेत, असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी सांगितलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!