Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vidhan Parishad Election 2026: पावसाळी अधिवेशनापूर्वीच राजकीय धुरळा! रिक्त असलेल्या 17 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर

Vidhan Parishad Election 2026: पावसाळी अधिवेशनापूर्वीच राजकीय धुरळा! रिक्त असलेल्या 17 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर

Vidhan Parishad Election 2026: राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये 16 नियमित जागांसह नागपूरच्या एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि निवडणूक कार्यक्रम
प्रदीर्घ काळ रिक्त राहिलेल्या या जागांसाठी आता खालीलप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे:

  • निवडणूक अधिसूचना: 25 मे 2026
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 1 जून 2026
  • अर्जांची तांत्रिक छाननी: 2 जून 2026
  • अर्ज माघारी घेण्याची मुदत: 4 जून 2026
  • मतदान प्रक्रिया: 18 जून (सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत)
  • मतमोजणी व निकाल: 22 जून 2026

निवडणुकीचे समीकरण आणि विलंब का झाला?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे या जागा रिक्त होत्या. नियमानुसार, संबंधित मतदारसंघात किमान 75% मतदार (लोकप्रतिनिधी) उपलब्ध असल्याशिवाय ही निवडणूक घेता येत नाही. आता ही अट पूर्ण झाल्याने आयोगाने मतदानाची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नागपूर जागेवरही याच वेळी पोटनिवडणूक होणार आहे.

या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणूक

सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!