Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात नाशिकचे बडे डॉक्टर्स रडारवर; ‘त्या’ निळ्या गोळ्यांचे गूढ उकलणार?

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात नाशिकचे बडे डॉक्टर्स रडारवर; ‘त्या’ निळ्या गोळ्यांचे गूढ उकलणार?

Ashok Kharat Case: महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य सूत्रधार अशोक खरात याच्या कृत्यांची व्याप्ती आता वैद्यकीय क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. खरातच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे होत असून, पीडित महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी नाशिकमधील काही मोठ्या डॉक्टरांची मदत घेतली गेल्याचा संशय ‘एसआयटी’ने (SIT) व्यक्त केला आहे. यामुळे शहरातील वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

औषधांचा वापर आणि ‘गर्भनिरोधक’ कनेक्शन
पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. या तपासात असा संशय व्यक्त केला जात आहे की, जाळ्यात ओढलेल्या महिलांना गर्भधारणा होऊ नये यासाठी खरात त्यांना विशिष्ट प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या किंवा औषधे देत होता. ही प्रतिबंधित औषधे त्याला कोठून उपलब्ध झाली आणि कोणत्या डॉक्टरांनी त्याला ही औषधे पुरवली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

संमोहित करण्यासाठी ड्रग्सचा वापर?
खरात हा केवळ मंत्रतंत्राचा आधार घेत नव्हता, तर महिलांना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना काही गुंगीकारक किंवा संमोहित करणारी औषधे (Drugs) दिली जात होती का? असा गंभीर प्रश्न तपासात समोर आला आहे. पीडितेची शुद्ध हरपवण्यासाठी तिला खाण्यापिण्यातून काही विशिष्ट पदार्थ दिले जात होते का, याचीही पडताळणी आता सुरू आहे.

गुन्ह्यात सहभागी असलेल्या नामांकित क्लिनिक आणि हॉस्पिटलचे रेकॉर्ड तपासले जात आहेत. खरातने पीडितेवर मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी वापरलेल्या तंत्राचे आणि त्यावेळच्या पीडितेच्या स्थितीचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. जर या प्रकरणात डॉक्टरांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य असल्याचे निष्पन्न झाले, तर नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांना अटक होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत एसआयटीच्या तपासातून या प्रकरणातील ‘मेडिकल नेक्सस’ उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खरातच्या या कृष्णकृत्यामध्ये पांढरपेशी गुन्हेगारही सामील आहेत का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!