Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

IAS Transferred: राज्यात मोठे प्रशासकीय फेरबदल! आर्थिक वर्षाच्या अखेरीस 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transferred: राज्यात मोठे प्रशासकीय फेरबदल! आर्थिक वर्षाच्या अखेरीस 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transferred: आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असलेल्या 31 मार्च रोजी राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासह राज्यातील 10 वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. या फेरबदलात अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी झालेली नियुक्ती सर्वात महत्त्वाची मानली जात आहे.

मुंबईला मिळाल्या नव्या महिला आयुक्त
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त भूषण गगराणी आज, 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त जागी अश्विनी भिडे यांची वर्णी लागली असून, त्यांना आजच पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिडे आता देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचा गाडा हाकणार आहेत.

तुकाराम मुंढे यांच्याकडे ‘आपत्ती व्यवस्थापन’ची धुरा
आपल्या शिस्तप्रिय आणि आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची आता ‘प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन’ या महत्त्वाच्या विभागात बदली करण्यात आली आहे. महसूल व वन विभागांतर्गत येणाऱ्या या विभागात मुंढे यांच्या अनुभवाचा राज्याला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बदली झालेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची यादी – (अधिकारी आणि नवीन पदभार / विभाग)

विनीत वैद्य सिंगल (भाप्रसे) – यांची प्रधान सचिव , मृद आणि जलसंधरण विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.
तुकाराम मुंढे (भाप्रसे) यांची – प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन , महसूल वन विभाग येथे बदली झाली आहे.
लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांची – मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
लहू माळी (भाप्रसे) यांची- व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित येथे बदली झाली आहे.
परिमल सिंह (भाप्रसे) यांची – सचिव (कृषी), कृषी आणि पदुम विभाग, मंत्रालय येथे बदली झाली आहे.
विकास चंद्र रस्तोगी (भाप्रसे) यांची- अप्पर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.
माणिक गुरसाळ (भाप्रसे) यांची – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे बदली झाली आहे.
पृथ्वीराज बी. पी (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त वसई विरार महानगरपालिका येथे बदली झाली आहे.
आश्विनी भिडे (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे बदली झाली आहे.
प्रेरणा देशभ्रतार (भाप्रसे) यांची- आयुक्त, मत्य्यव्यवसाय मुंबई येथे बदली झाली आहे.

‘मार्च एंडिंग’ला बदल्यांचा धडाका
आर्थिक वर्ष संपत असतानाच सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विभागांना सक्षम नेतृत्व देण्यासाठी हे फेरबदल केल्याचे बोलले जात आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने आपल्या नवीन पदाचा कार्यभार हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!