Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजकीय विरोध करा, पण महिलांची बदनामी नका! पूजा मोरे यांच्या ट्रोलिंगवर मनोज जरांगे संतापले

राजकीय विरोध करा, पण महिलांची बदनामी नका! पूजा मोरे यांच्या ट्रोलिंगवर मनोज जरांगे संतापले

Manoj Jarange On Pooja More: महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सध्या मुद्द्यांच्या राजकारणापेक्षा वैयक्तिक चिखलफेक आणि बदनामीचे सत्र जोरात सुरू आहे. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरे यांना त्यांच्या जुन्या व्हिडिओंच्या आधारे सोशल मीडियावर लक्ष्य केले जात असल्याबद्दल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजकीय विरोध करा, पण महिलांची बदनामी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी ट्रोलर्सना सुनावले आहे.

राजकारणाची पातळी घसरली; जरांगे पाटलांचे रोखठोक मत

नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी निवडणुकीतील घसरत्या स्तरावर भाष्य केले. ते म्हणाले की, निवडणुकीत उमेदवाराची धोरणे आणि कार्यपद्धती यावर चर्चा होणे अपेक्षित असताना, केवळ जुने व्हिडिओ उकरून काढून वैयक्तिक बदनामी करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देणारे नाही. विचारधारेची लढाई वैयक्तिक द्वेषापर्यंत जाणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल; ट्रोलिंगनंतर रडत-रडत अर्ज माघार अन् राज्यभर चर्चा, कोण आहेत पूजा मोरे?

ट्रोलर्सना इशारा

पूजा मोरे यांच्या व्हायरल व्हिडिओंवरून सुरू असलेल्या टीकेवर जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले. त्यांनी थेट इशारा दिला की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा आमचा स्वभाव आहे. जर एखाद्या उमेदवाराला अशा प्रकारे जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांची बदनामी केली जात असेल, तर ती कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. हे घाणेरडे प्रकार थांबवा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

हेही वाचा – PMC Election 2026: सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर भाजपाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून माघार; पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्या

पक्षीय राजकारणापलीकडे ‘महिला सन्माना’ची भूमिका

नेहमी भाजप आणि सत्ताधारी नेत्यांवर तुटून पडणारे मनोज जरांगे पाटील यावेळी मात्र भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी ‘महिला सन्मान’ आणि ‘सामाजिक भान’ जपण्याचा संदेश दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!