Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Muralidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरण! राजू शेट्टींच्या आरोपावर मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण, म्हणाले “राजकीय करियर प्रभावित…”

Muralidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरण! राजू शेट्टींच्या आरोपावर मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण, म्हणाले “राजकीय करियर प्रभावित…”

Muralidhar Mohol On Jain Barding Land Case: पुण्यात गुन्हेगारीची प्रकरणे ताजी असतानाच आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत खळबळ उडाल्यानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर राजू शेट्टी यांनी आरोप केलेत, त्यांनी संपूर्ण जमीन व्यवहाराला घेऊन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मोहोळ यांनी हा व्यवहार त्वरित रद्द करायला हवा, अशी थेट मागणी केली.

त्याशिवाय, अधिकची माहिती देताना ते म्हणाले की, गोखले बिल्डर्सने कर्जासाठी अर्ज केल्यानंतर कर्नाटकातल्या सीकोडीतील अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने लगेचच 50 कोटी रुपयांचे कर्ज कसे मंजूर केले? या तातडीच्या कर्ज मंजुरीमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा मंत्री म्हणून सहभाग असल्याशिवाय हे शक्य नाही, असा थेट आरोप शेट्टी यांनी केला.

सीकोडीतील क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब हे भाजपचे माजी खासदार आहेत. या व्यवहाराला बेकायदेशीररित्या मान्यता देणारे धर्मादाय आयुक्त कलोते हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

या सर्वाला प्रतियत्तर देताना ते म्हणाले की, मी चार दिवस पुण्याच्या बाहेर होतो. त्यामुळे या प्रकरणाबाबत केवळ माध्यमातूनच माहिती मिळाली. राजू शेट्टी यांनी काही आरोप केले, पण ते सत्य परिस्थितीशी जुळत नाहीत. मी पुणेकरांच्या विश्वासासाठी स्पष्ट करतो की, मी जैन बोर्डिंग हाऊस व्यवहारात सहभागी नव्हतो, असं मोहोळ यांनी सांगितलं. मी गोखले बिल्डरचा पार्टनर आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सर्वकाही माहिती दिली असल्याचं देखील मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.

मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की, गोखले बिल्डरसोबतचे एलएलपी (Jain Barding Land Case) प्रकल्पात त्यांचा सहभाग फक्त 2023 मध्येच होता. 25 नोव्हेंबर 2024 रोजी ते दोन्ही एलएलपी मधून बाहेर पडले. माझा या व्यवहाराशी कोणताही संबंध 2024 नंतर नाही. जैन बोर्डिंग हाऊसची खरेदी आणि विक्री गोखले एलएलपी द्वारेच झाली असून माझे नाव त्या व्यवहारात नाही, असं मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.

त्यांनी सांगितले की, त्यांनी सर्व आर्थिक व्यवहार निवडणूक प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहेत आणि हे सर्व सार्वजनिक दस्तऐवजांवर आधारित आहे. मी शेती व्यवसाय आणि बांधकाम व्यवसाय करत आहे, पण राजकारण्यांनी व्यवसाय केले तरी तो पूर्णपणे स्वच्छ आहे, असेही त्यांनी नमूद केले. मंत्री मोहोळ यांनी राजू शेट्टी यांच्यावर टोकाचे आरोप करताना संवादसाधल्याबाबतही दुःख व्यक्त केले. जर त्यांनी प्रत्यक्ष भेटून किंवा कॉल करून विचारले असते, तर मी सत्य परिस्थिती स्पष्ट केली असती. चुकीच्या आरोपांमुळे एखाद्याचे राजकीय करियर प्रभावित होऊ शकते, असंही मोहोळ यांनी सांगितलं.

मोहोळ यांनी पुढे म्हटले की, जैन बांधवांशी त्यांचा संवाद सुरू असून, त्यांना मदत करायची असल्यास ते तत्पर आहेत. मी पुणेकरांचा लोकप्रतिनिधी आहे, कोणत्या भागीदारीत राहता येईल किंवा नाही, याचे नियम मी पाळतो. या प्रकरणात कोणताही गैरसमजराहावा, म्हणून स्पष्ट करतो, असे त्यांनी नमूद केले. अखेर, केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी ही प्रकरणाची माहिती सर्व संबंधितांना देण्याची तयारी असल्याचे सांगितले आणि कोणताही प्रश्न असल्यास योग्य तपासणी करण्यासाठी खुली भूमिका ठेवली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!