Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

निवडणूक आयोगाने आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; मतदार यादीत पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी

निवडणूक आयोगाने आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; मतदार यादीत पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी

पुणे: राज्य निवडणूक आयोगावर रोज नवनवे आरोप तर होतायतचं, पण आता निवडणूक आयोगानेचं आम्हाला बारामती आणि इंदापूरमध्ये घर घेऊन द्यावं, अशी उपरोधिक मागणी ऐनवेळी पत्ता बदललेल्या मतदाराने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाला अडचणीत आणणारी ही मागणी करणारे पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख आणि त्याचे वडील युनूस शेख हे आहेत.

इम्रानचे वडील युनूस शेख यांचं नाव इंदापूर विधानसभेत तर आई रबिया शेख यांचं नाव बारामती विधानसभेत ऐनवेळी ट्रान्स्फर करण्यात आलंय. मुळात इम्रान याचं कुटुंब गेल्या 35 वर्षांपासून भोसरी विधानसभेत वास्तव्यास आहेत. 2024 च्या विधानसभेला ही इम्रानचे वडील युनूस आणि आई रबिया यांनी भोसरीत मतदान केलंय. याचा पुरावा ही त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

निवडणूक आयोगाने बारामती अन इंदापुरात घर घेऊन द्यावं

आयुष्यात आमचा बारामती आणि इंदापूर विधानसभेशी कधी संबंध आला नाही, ना आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं नाव तिकडे ट्रान्स्फर करण्यासाठी अर्ज केला. तरी ही निवडणूक आयोगाने हा स्वतःहून कारभार केलाय, मग आता बारामती आणि इंदापुरच्या त्या पत्त्यावर मला आणि माझ्या पत्नीला त्यांनी घर घेऊन द्यावं, अशी उपरोधिक मागणी करत युनूस शेख यांनी निवडणूक आयोगाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय.

हे षडयंत्र रचलं

तर दुसरीकडे मला आगामी पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक लढण्याची इच्छा आहे, मात्र मला तिकीट मिळणं कठीण दिसतंय. असं म्हणत इम्रान शेख यांनी मी माझ्या आई-वडिलांपैकी एकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत होतो. हे विरोधकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी हे षडयंत्र रचलं. आतापर्यंत आम्ही वोट चोरी पाहिली होती, आता उमेदवारांची अन मतदारांची पळवापळवी सुरु झाली, असा आरोप यानिमित्ताने इम्रान शेख यांनी केलाय.

नेत्यांचा निवडणूक आयोगाला सवाल

इतकंच नव्हे तर खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी सुद्धा यावरुन निवडणूक आयोगासह विरोधकांना लक्ष केलंय. आमच्या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याच्या आई-वडिलांची नावं दुसऱ्या विधानसभेत कशी काय गेली? असा प्रश्न या नेत्यांनी एक्स प्लँटफॉर्मवरून निवडणूक आयोगाला विचारलाय. आता या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून काही उत्तर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!