GST Officers Protest: राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि. ८) आंदोलन सुरू केले. अनेक लेखी निवेदने, बैठका आणि चर्चेनंतरही प्रशासनाकडून अपेक्षित निर्णय न मिळाल्यामुळे अधिकारी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आहेत. सोमवारी येरवडा येथील राज्य जीएसटी मुख्यालयासमोर अधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाची सुरुवात केली.
काळ्या फिती लावून कामकाज
दरम्यान, संघटनेने आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी सर्व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले, तर बुधवारी सामुदायिक रजा देऊन पुढील आंदोलन छेडण्याची योजना आहे.
हेही वाचा – Pune Press Club: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! पुणे प्रेस क्लबसाठी नव्या प्रशस्त जागेला मंजूरी
अधिकार्यांच्या संघटनेचे उपाध्यक्ष विकास शेवाळे, सहसचिव डॉ. किर्ती-राज जाधव, सौ. संगिता दरेकर, सदस्य प्रवीण काळे, अभिजीत गायकवाड, सौ. पूजा डोणगापुरे आणि मोठ्या संख्येने अधिकारी या आंदोलनात सहभागी होते.


