Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात तरुणांची कोयता दाखवून दहशत; पोलिसांनी उतरवला माज, गावभर काढली धिंड

Pune Crime: पुण्यात तरुणांची कोयता दाखवून दहशत; पोलिसांनी उतरवला माज, गावभर काढली धिंड

पुणे : धायरी गावात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची वरात काढल्याची घटना घडली आहे. आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी हत्यारांचा धाक दाखवून नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रथमेश देविदास बनसोडे (वय 23), आभिद महेश गुरव (वय 25) आणि आदेश बाळू वाळके (वय 22) या तिघांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी धायरी गावातील असून, स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धायरी येथील पवळी चौकात आरोपींपैकी एकाने कारच्या बोनेटवर चढून हातात कोयता घेतला आणि जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना धमकावले. त्याच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांनीही शिवीगाळ करत गोंधळ घातला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. उपस्थितांनी तत्काळ पोलिसांना कळवले आणि नांदेड सिटी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.

प्राथमिक तपासात या तरुणांनी समाजमाध्यमांवर लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि गँगस्टर स्टाइल दाखवण्यासाठी हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी आपली दहशत दाखवण्यासाठी कोयता हातात घेऊन व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून त्यांना अटक केली.

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांची वरात काढली, जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा. पोलिसांनी आरोपींना गावातील रस्त्यांवरून फिरवत नागरिकांना दाखवले की कायद्याच्या विरोधात वागणाऱ्यांना शिक्षा नक्कीच मिळते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!