Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vijay Wadettiwar: ‘ट्रम्प यांच्यावर झालेला गोळीबार त्यांच्याच कृत्यांचा परिणाम’; विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य

Vijay Wadettiwar: ‘ट्रम्प यांच्यावर झालेला गोळीबार त्यांच्याच कृत्यांचा परिणाम’; विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य

Vijay Wadettiwar: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली असताना, महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावर अत्यंत खळबळजनक आणि वादग्रस्त भाष्य केले आहे. “जसे पेराल, तसे उगवेल,” असे म्हणत वडेट्टीवार यांनी ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे समर्थनवजा विश्लेषण केले आहे. इतकेच नव्हे तर, भारतातील जनतेची भावनाही ट्रम्प यांच्या विरोधातील जनक्षोभासारखीच असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.

‘जसे पेराल तसे उगवेल’; ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका
विजय वडेट्टीवार यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, सत्तेवर असताना आणि सर्वोच्च पदावर असताना ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. “त्यांनी जगातील अनेक देशांना अस्थिर करण्याचे काम केले आणि प्रत्येक राष्ट्रावर स्वतःचे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या देशाचीही त्यांनी दुरवस्था केली आहे. इराणशी थेट संबंध नसताना इस्रायलच्या मदतीने तिथे हस्तक्षेप केला. माणसाला आपल्या कृत्यांचे फळ भोगावेच लागते, या घटनेवरून हेच स्पष्ट होत आहे,” असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

‘भारत विनाशाच्या मार्गावर’; देशातील परिस्थितीवर ओढले ताशेरे
केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष हल्ला चढवताना वडेट्टीवार यांनी असा दावा केला की, अमेरिकेत जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याचेच प्रतिबिंब भारतातही पाहायला मिळत आहे. त्यांच्या मते, भारत देश सध्या विनाशाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. “भारतातील जनतेच्या मनातही संताप आहे, मात्र लोक सध्या निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरत नाहीत. लोकांना सध्या ‘सगळे काही ठीक आहे’ असे वाटत असले, तरी जनतेच्या मनात आजही हीच भावना आहे की देश चुकीच्या दिशेने जात आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.

चुकीचे वर्तन करणाऱ्यांना जनता जाब विचारणार
आपल्या विधानाचा समारोप करताना वडेट्टीवार यांनी इशारा दिला की, जनता कधीही शांत बसत नाही आणि वेळ आल्यावर चुकीचे वर्तन करणाऱ्यांना नक्कीच प्रत्युत्तर देते. “जी घटना घडली, ती खऱ्या अर्थाने त्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडायला नको होती. मात्र, जेव्हा राज्यकर्ते स्वतःच्या अजेंड्यासाठी देशाला विनाशाच्या खाईत लोटतात, तेव्हा जनता त्यांना जाब विचारतेच,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!