Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शासन निर्णयाविरोधात उजनी धरण बचाव संघर्ष समिती आक्रमक; बुधवारी कांदलगाव येथे बैठकीचे आयोजन

शासन निर्णयाविरोधात उजनी धरण बचाव संघर्ष समिती आक्रमक; बुधवारी कांदलगाव येथे बैठकीचे आयोजन

इंदापूर : उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समिती यांचेकडून शेतकरी मच्छीमार बांधवांसाठी बुधवार (दि.11) रोजी कांदलगांव (ता. इंदापूर) याठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली.

प्रमुख मागण्या आणि बैठकीचा उद्देश
या बैठकीमध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा होऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे:

  • शासन निर्णय रद्द करणे: १७ जून २०१९ आणि ८ ऑक्टोबर २०२५ चे शासन निर्णय तातडीने रद्द करावेत.
  • जमिनीचा हक्क: धरणासाठी संपादित केलेली परंतु अद्याप वापरात नसलेली जमीन मूळ शेतकऱ्यांना परत द्यावी किंवा करारावर द्यावी.
  • उपजीविकेचे संरक्षण: शेतकऱ्यांची संपादित जमीन त्यांच्याकडेच उपजीविकेसाठी कायम ठेवावी. ती खाजगी कंपन्यांना किंवा उद्योगपतींना देऊ नये.
  • मच्छिमारांचे हित: उजनी धरणावर अवलंबून असलेल्या मच्छिमार बांधवांचा मासेमारीचा हक्क अबाधित राहावा.

दरम्यान, शेतकरी आणि मच्छिमारांच्या अस्तित्वाचा हा लढा आहे. प्रशासकीय अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व धरणग्रस्त आणि मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!