Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Priyanka Chaturvedi: ठाकरेंच्या बैठकीत राडा! प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; ‘I Want to Protest’ म्हणत मांडली रोखठोक भूमिका

Priyanka Chaturvedi: ठाकरेंच्या बैठकीत राडा! प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; ‘I Want to Protest’ म्हणत मांडली रोखठोक भूमिका

Priyanka Chaturvedi: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत मोठे नाट्य पाहायला मिळाले. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेत खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पक्षप्रमुखांसमोरच आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बैठकीत नेमका वाद कशावरून झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील राज्यसभा जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांनी या जागेसाठी ठाकरेंशी संपर्क साधला होता. “आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार, तुम्ही राष्ट्रवादीशी बोला,” असे सांगत ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संभाव्य संघर्ष कसा टाळला, याचे विवेचन बैठकीत केले. मात्र, याच दरम्यान प्रीयंका चतुर्वेदी यांनी मध्येच हस्तक्षेप करत संताप व्यक्त केला. “I want to protest,” असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संजय राऊत यांनी शरद पवार यांचे नाव का घेतले?” असा सवाल त्यांनी थेट विचारला. यावर उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू सावरत, “ते बोलले म्हणून काय झाले, शेवटी निर्णय मीच घेणार आहे,” असे स्पष्ट करत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

खासदारांची आदित्य ठाकरेंवरही नाराजी?
या बैठकीत केवळ अंतर्गत वादच नाही, तर नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा झाल्याचे समजते. मराठवाड्यातील एका खासदाराने प्रियांका चतुर्वेदी यांना दिलेल्या 6 वर्षांच्या संधीबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच, आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात अधिक सक्रीय होण्याची गरज असल्याचे मत काही खासदारांनी व्यक्त केले. “आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा करायला हवा,” अशी तक्रार खासदारांनी केल्यावर आदित्य ठाकरे काहीसे नाराज दिसले आणि त्यांनी त्यानंतर कोणताही संवाद साधला नाही.

‘माझा तुमच्यावर विश्वास’ – उद्धव ठाकरे
बैठकीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. “भाजप आणि राष्ट्रवादीकडून तुमचे खासदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही संपूर्ण लढाई मी तुमच्याच जीवावर लढत आहे,” अशा शब्दांत त्यांनी सहकाऱ्यांचे मनोबल वाढवले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!