Today शुक्रवार, 31st जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ; राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात

कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ; राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात

Narhari Zirwal Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका कथित वादग्रस्त व्हिडिओमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत शासकीय निवासस्थानी आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

नेमके प्रकरण काय?
गेल्या काही तासांपासून समाज माध्यमांवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सुमारे 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात असून, यामध्ये मंत्री महोदय एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मद्याच्या बाटल्याही दिसत असल्याचे समोर आले आहे. संबंधित तृतीयपंथी व्यक्तीचे नाव पवन यादव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या कथित व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही.

विरोधकांचा कडाडून हल्ला
या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केला असून, “हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे उदाहरण आहे,” अशी टीका केली आहे. जबाबदार लोकप्रतिनिधीने सार्वजनिक जीवनातील किमान नैतिकता पाळावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली असून, “व्हिडिओ पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” असे म्हटले आहे.

सत्ताधारी आणि मंत्र्यांची भूमिका
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांचा फोन सध्या ‘स्विच्ड ऑफ’ असल्याचे समजते, त्यामुळे त्यांची बाजू अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरण ताजे असताना आता या नवीन वादामुळे मंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या संवेदनशील प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!