Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना ‘चिकन मसाला’ भेट; वारकरी संप्रदायात संताप, मंदिर समितीकडून BVG कंपनीला नोटीस

विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना ‘चिकन मसाला’ भेट; वारकरी संप्रदायात संताप, मंदिर समितीकडून BVG कंपनीला नोटीस

पंढरपूर: सद्या सर्वत्र दिवाळीच्या सणाची तयारी सुरू आहे. मात्र, आता पंढरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विठ्ठल मंदिरात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला देण्यात आला. यामुळे वारकरी संप्रदायात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वारकरी संप्रदायात असंतोष

वारकरी परंपरेत मांसाहार, मद्यपान किंवा अशुद्ध अन्नपदार्थांचा स्वीकार निषिद्ध मानला जातो. मात्र, पंढरपूरसारख्या पवित्र भूमीत विठ्ठल मंदिराशी संबंधित कर्मचाऱ्यांना मांसाहाराशी निगडित भेटवस्तू देण्यात आल्याने श्रद्धाळूंमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

बीव्हीजी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना गिफ्ट वाटप

विठ्ठल मंदिरात सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी बीव्हीजी कंपनीमार्फत आउटसोर्सिंग पद्धतीने कार्यरत आहेत. दिवाळी निमित्त कंपनीने या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या, ज्यात विविध मसाल्यांसह ‘चिकन मसाला’चे पाकिटही होते. मसाल्यावरील मांसाहारी पदार्थाचे चित्र पाहून वारकरी संतप्त झाले. त्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला.

हेही वाचा – दिवाळीत पावसाचं सावट, राज्यातील ‘या’ भागात यलो अलर्ट जारी; मुंबई-कोकणात हवामान बदलणार

मंदिर समितीचा तात्काळ हस्तक्षेप

दरम्यान, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, ही घटना समोर आल्यानंतर लगेच कंपनीला भेटवाटप थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित मसाल्यावरील छायाचित्र आक्षेपार्ह असल्याचे लक्षात आले असून, मंदिर समितीने बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली आहे. मंदिराचे पावित्र्य राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि या प्रकरणात निश्चितच कारवाई केली जाईल.

याशिवाय, वारकरी नेते माऊली महाराज शिरवळकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटलं की, विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना चिकन मसाला देणे म्हणजे श्रद्धेवर आघात करण्यासारखं आहे. दिवाळीला लाडू, चिवडा देण्याची प्रथा असताना मांसाहारी मसाला देणे अत्यंत असंवेदनशील आहे. उद्या हे लोक चिकनच वाटतील, अशी परिस्थिती होऊ नये म्हणून तात्काळ कारवाई करावी. या प्रकरणामुळे बीव्हीजी कंपनीवर शिस्तभंगात्मक कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंदिर समितीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, वारकरी संप्रदायाने मंदिराच्या पावित्र्याचे रक्षण करण्याची मागणी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!