लोणी काळभोर: रेल्वे अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे दौंड लोहमार्गावरून भरधाव वेगाने चाललेल्या उद्यान एक्सप्रेसने एका ट्रक चालकला धडक दिली. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना लोणी रेल्वे स्थानकात आज शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
मनोज कांबळे असे मृत ट्रक चालकाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. मनोज हा लोणी काळभोर येथील मालधक्क्यात ट्रकचालक म्हणून काम करत होता. दरम्यान, मनोज हा दुपारच्या सुमारास रेल्वे लाईन क्रॉस करीत होता. तेव्हा त्याच्या कानात हेडफोन होता. त्यामुळे त्याला गाडीचा आवाज आला नाही आणि सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चाललेल्या उद्यान एक्सप्रेस ने त्याला जोरदार धडक दिली.
दरम्यान, या अपघातात मनोज कांबळे याचा जागेवरच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास करत आहेत.


