Today गुरूवार, 17th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील ‘या’ भागात उद्या पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे आवाहन, पुरवठा कधी होणार पूर्ववत? वाचा

पुण्यातील ‘या’ भागात उद्या पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे आवाहन, पुरवठा कधी होणार पूर्ववत? वाचा

Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील मुख्य जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी (24 मार्च 2026) शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा पुणे महानगरपालिकेने केली आहे. बुधवारी (25 मार्च) सकाळी पाणीपुरवठा पूर्ववत होणार असला, तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी नियोजनाने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उद्या ‘या’ परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 
सेनापती बापट रोड: रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा (डावीकडील आणि उजवीकडील) परिसर.
गोखले नगर परिसर: आशानगर, गोखले नगर, बहीरटवडी.
शिवाजीनगर आणि मॉडेल कॉलनी: मॉडर्न कॉलेज शेजारील परिसर, मॉडेल कॉलनी, चिखलवाडी.
औंध-बाणेर पट्टा: भोसले नगर, कॅशरकर वाडी, औंध आणि बाणेरचा काही भाग.
बोपोडी: संपूर्ण बोपोडी परिसर.

पाणीपुरवठा कधी पूर्ववत होणार?
महानगरपालिकेने दिलेल्या निवेदनानुसार, जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर बुधवार (25 मार्च 2026) रोजी सकाळी सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत आणि सुरळीत सुरू होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!