Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Passport Office: पुणे पासपोर्ट ऑफिसचा पत्ता बदलला! 30 मार्चपासून मुंढवा नव्हे, तर ‘या’ ठिकाणावरून होणार कामकाज

Pune Passport Office: पुणे पासपोर्ट ऑफिसचा पत्ता बदलला! 30 मार्चपासून मुंढवा नव्हे, तर ‘या’ ठिकाणावरून होणार कामकाज

Pune Passport Office: पुणे पासपोर्ट प्रशासनाने एक मोठा बदल जाहीर केला आहे. मुंढवा येथील ‘झीरो वन’ इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ (PSK) आता कायमस्वरूपी बंद होऊन पाषाण येथे स्थलांतरित होणार आहे. येत्या ३० मार्च २०२६ पासून या नवीन कार्यालयातून नागरिकांना सेवा दिली जाईल. प्रामुख्याने बाणेर, पाषाण, औंध, बावधन आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रहिवाशांसाठी हे केंद्र आता अधिक जवळ आणि सोयीचे ठरणार आहे.

नवीन कार्यालयाचा पत्ता आणि ठिकाण
वाढती गर्दी आणि अत्याधुनिक सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने हे कार्यालय हलवण्यात आले आहे. नागरिकांनी आता खालील पत्त्यावर संपर्क साधावा:
नवीन पत्ता: ‘मॉटक्लेयर बिल्डिंग’, कार्यालय क्र. १०१-१०२, पहिला मजला, बाणेर-पाषाण लिंक रस्ता, पाषाण, पुणे.

अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांसाठी सूचना
ज्या नागरिकांनी ३० मार्च २०२६ किंवा त्यानंतरच्या तारखेसाठी मुंढवा केंद्राची वेळ (Appointment) आधीच आरक्षित केली आहे, त्यांना आता थेट पाषाण येथील नवीन केंद्रावर हजर राहावे लागेल. पासपोर्ट कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, अपॉइंटमेंटची तारीख आणि वेळ यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, केवळ पत्ता बदलला आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या वेळेत नवीन केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

स्थलांतरामुळे वादाची ठिणगी; संमिश्र प्रतिक्रिया
या निर्णयाचे कोथरूड आणि बावधन भागातील नागरिकांनी स्वागत केले असले तरी, पूर्व पुण्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. विमान वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी या स्थलांतराला विरोध दर्शवला आहे. हडपसर, वाघोली आणि खराडी भागातील लोकांसाठी पाषाण हे ठिकाण अत्यंत लांब आणि प्रवासासाठी खर्चिक पडणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!