नवी दिल्ली : सध्या एअर कंडिशनर अर्थात एसी वापरणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. उन्हाळ्यात एसी तर थंडीत गरम पाण्यासाठी गिझर वापरला जातो. हीच गरज लक्षात घेता दिवाळीसाठी फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सेल पुन्हा सुरु झाला आहे. मात्र, या ब्रँडवर तुम्हाला मोठा डिस्काउंटही मिळत आहे.
सध्या ऑनलाईन मार्केटमध्ये व्होल्टास आणि व्होल्टास बेको सीरीजमधील उत्पादनांवर उपलब्ध आहे. तुम्ही याचा फायदा घेऊ शकता आणि विविध उत्पादनांवर बचत करू शकता. कंपनीने दिवाळी ऑफरची घोषणा केली आहे, ज्यामध्ये सोपे ईएमआय पर्याय देण्यात आली आहेत. फिक्स्ड् ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत, जे दरमहा १०८८ पासून सुरू होतात. ऑफरमध्ये झिरो डाउनपेमेंट, झिरो व्याज आणि कॅशबॅक समाविष्ट आहे. कंपनी निवडक बँक कार्डसह तिच्या उत्पादनांवर ६००० रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे.
याशिवाय, ते कमी इन्स्टॉलेशन पर्याय देखील देत आहे. ही ऑफर निवडक एअर कंडिशनरवर उपलब्ध आहे. कंपनी वॉटर हीटर्सवर मोफत इंस्टॉलेशन देखील देत आहे. कंपनी विविध उत्पादनांवर सवलती देखील देत आहे. कंपनीची वॉशिंग मशीन रेंज २०९९० रुपयांपासून सुरू होते. या दिवाळी सेल असल्याने डिस्काउंट मिळत आहे.


