नवी दिल्ली : सध्या सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगला पसंती दिली जात आहे. त्यानुसार, अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स ग्राहकांना खरेदीवर भलामोठा डिस्काउंटही देत असते. त्यातच आता फ्लिपकार्टवर एक नवीन सेल सुरू होत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा बिग बँग दिवाळी सेल सुरू झाला आहे. या सेलचा फायदा घेऊन सवलतीच्या दरात अनेक स्मार्टफोन खरेदी करू शकता. केवळ स्मार्टफोनच नाही तर या सेलमध्ये घरगुती उपकरणे आणि इतर उत्पादनांवरही सूट मिळते.
फ्लिपकार्ट सेल दरम्यान iPhone 16, Nothing Phone 3 आणि गुगल पिक्सेलसह इतर फोनवर सूट उपलब्ध आहे. स्मार्टफोन व्यतिरिक्त, तुम्ही टीव्ही, लॅपटॉप आणि इतर घरगुती उपकरणे देखील सवलतीच्या दरात खरेदी करू शकता. या सेल दरम्यान अनेकांचे लक्ष आयफोनवर असणार आहे. जर तुम्ही फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल चुकवला असेल, तर तुमच्याकडे अजूनही संधी आहे. iPhone 16 हा ५४९९९ च्या सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहे. यामध्ये तुम्हाला ३००० रुपयांचा बँक डिस्काउंटही मिळणार आहे.
तुम्ही iPhone 16 Pro हा फोन ८४९९९ मध्ये देखील खरेदी करू शकता येतो. या सेलदरम्यान iPhone 16 Pro Max १०२९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. ही किंमत डिस्काउंट नंतरची आहे. फ्लिपकार्ट सेल दरम्यान तुम्ही Samsung Galaxy S24 ३८९९९ रुपयांना खरेदी करू शकता. Galaxy A35 5G हा फोन देखील १७९९९ रुपयांना उपलब्ध असेल.


