महाराष्ट्र जागरण डेस्क: डोळ्यांच्या सुंदरतेत पापण्यांचं खूप महत्त्व असतं. काही लोकांच्या पापण्या विरळ असतात. ज्यामुळे त्यांना आय मेकअपवर खूप लक्ष द्यावं लागतं किंवा खोट्या पापण्या लावाव्या लागतात. परंतु, जराशी केअर केल्याने नैसर्गिकपणे पापण्या दाट होऊ शकतात. यासाठी काही घरगुती उपचार करायचे आहेत.
कसे तयार करायचे हे मास्क
- दोन चमचे एरंडेलचे तेल घेऊन पाच मिनिटे मंद आचेवर गरम करा. नंतर आच बंद करून तेल गार होऊ द्या. यात आढळणारे अँटीऑक्सिडंट रोम विकसित करण्यास मदत करतील आणि पापण्या दाट करतील.
- व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. सुईने त्यात भोक करून जेल बाहेर काढा. एका चमच्यात घेऊन कस्टर ऑइलसोबत मिसळून घ्या.
- कोरफडचे पान घेऊन त्याचे जेल काढा आणि चमच्यात घेतलेल्या मिश्रणात फेटून घ्या. या मिश्रणात एक चमचा पेट्रोलियम जेली मिसळू शकता. याने पापण्या गळत नाहीत आणि दाट होतात.
ब्रशच्या मदतीने हे मास्क पापण्यांवर लावा. हे लावण्यापूर्वी आपल्याला पापण्या ब्रशने स्वच्छ कराव्या लागतील. हे मिश्रण आयब्रोवरही लावू जता. हे मास्क रात्रभर असेच राहू द्या. सकाळी आपल्याला आपल्या आयब्रो आणि पापण्या नरम वाटतील. हवं असल्यास ३० सेकंद मास्कने मसाज करू शकता. हे मास्क फ्रीजमध्ये ठेवू शकता. अप्लाय करण्याच्या काही वेळापूर्वी बाहेर याला काढावे. एक महिन्यापर्यंत वापरण्याने फरक कळून येईल.
विशेष टीप : हे मास्क वापरताना इतर केमिकल वापरणे टाळावे. यासह प्रोटीन आणि व्हिटॅमिन आढळणाऱ्या आहाराचे सेवन करावे.


