Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gadchiroli: आईपणाचा संघर्ष संपला! प्रसूतीसाठी नऊ महिन्यांच्या गर्भवतीची जंगलातून वणवण; शेवटी माय-लेकराचा दुर्दैवी अंत

Gadchiroli: आईपणाचा संघर्ष संपला! प्रसूतीसाठी नऊ महिन्यांच्या गर्भवतीची जंगलातून वणवण; शेवटी माय-लेकराचा दुर्दैवी अंत

Gadchiroli: प्रगत महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव किती भयावह असू शकते, याचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातून समोर आली आहे. गावात साधी प्रसूती सुविधा नसल्यामुळे एका २४ वर्षीय गरोदर मातेला जंगलातून ६ किलोमीटरची पायपीट करावी लागली, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. या प्रवासाच्या थकव्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने पोटातील अर्भकासह मातेचाही मृत्यू झाला.

सुरक्षिततेचा शोध ठरला जीवघेणा

आशा संतोष किरंगा (रा. आलदंडी टोला) असे मृत मातेचे नाव आहे. आशा या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. गाव दुर्गम भागात असल्याने आणि तिथे प्रसूतीची सोय नसल्याने, ऐनवेळी अडचण येऊ नये म्हणून त्यांनी बहिणीच्या गावी (पेठा) जाण्याचा निर्णय घेतला. १ जानेवारी रोजी त्यांनी पतीसह ६ किलोमीटरचा जंगल प्रवास पायी पार केला. सुरक्षित प्रसूती व्हावी, हाच या पायपिटीमागचा एकमेव उद्देश होता.

उपचारांची धावपळ अन यंत्रणेचे अपयश

दरम्यान, २ जानेवारीच्या रात्री आशा यांना प्रसववेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने हेडरी येथील रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तपासणीअंती बाळ पोटातच दगावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बाळाच्या मृत्यूनंतर आशा यांचा रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि उपचारादरम्यान त्यांनीही प्राण सोडले.

शवविच्छेदनासाठी वणवण

मृत्यूनंतरही या कुटुंबाची हालअपेष्टा थांबली नाही. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने, शवविच्छेदनासाठी मृतदेह पुन्हा ४० किमी लांब अहेरीला हलवावा लागला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही गडचिरोलीच्या दुर्गम भागातील महिलांना प्रसूतीसाठी जीव मुठीत धरून जंगलातून चालावे लागते, ही बाब राज्यासाठी लाजीरवाणी ठरत आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, ग्रामीण आरोग्य यंत्रणा केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!