Today बुधवार, 28th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana: सरकारकडून लाडक्या बहिणींना न्यू इयरचं खास गिफ्ट! खात्यात जमा झाले ‘इतके’ रुपये

Ladki Bahin Yojana: सरकारकडून लाडक्या बहिणींना न्यू इयरचं खास गिफ्ट! खात्यात जमा झाले ‘इतके’ रुपये

Ladki Bahin Yojana: राज्यभरातील कोट्यवधी महिला ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होत्या, तो लाडकी बहीण योजनेचा हफ्ता अखेर जमा झाला आहे. बुधवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. मात्र, तीन महिन्यांचा हफ्ता एकत्र मिळेल या आशेवर असलेल्या महिलांच्या पदरी काहीसा अपेक्षाभंग पडला आहे.

केवळ १५०० रुपयेच का?

नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये किंवा जानेवारीसह ४५०० रुपये मिळतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. परंतु, सरकारने वर्षाच्या शेवटच्या दिवशी केवळ नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता वितरित करून महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. उर्वरित हफ्त्यांसाठी महिलांना आता पुढील निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.

ई-केवायसीची मुदत संपली; लाभ बंद होणार?

योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करण्याची अंतिम मुदत काल, ३१ डिसेंबर रोजी संपली आहे. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे १ जानेवारी २०२६ पासून येणारे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. आता सरकार या मुदतीला मुदतवाढ देणार की नियमांवर ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बँकेचा मेसेज आला नाही? मग असे तपासा पैसे

जर तुमच्या मोबाईलवर हफ्ता जमा झाल्याचा एसएमएस आला नसेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. तांत्रिक अडचणींमुळे मेसेज येण्यास उशीर होऊ शकतो. तुम्ही खालील मार्गांनी खातरजमा करू शकता:

  • पासबुक अपडेट: जवळच्या बँकेत जाऊन किंवा पासबुक प्रिंटिंग मशीनवर व्यवहार तपासा.
  • UPI/Net Banking: गुगल पे, फोन पे किंवा बँकेच्या अधिकृत ॲपवर ‘बँक बॅलेन्स’ चेक करा.
  • मिस्ड कॉल: बँकेच्या टोल-फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन बॅलेन्स जाणून घ्या.
  • ATM: जवळच्या एटीएममध्ये जाऊन ‘मिनी स्टेटमेंट’ काढून शेवटचा व्यवहार पहा.

या महिलांना बसू शकतो झटका

नवीन वर्ष २०२६ ला सुरुवात झाली असली तरी, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा ज्यांचे ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांना यापुढे अपात्र ठरवले जाऊ शकते. नियमानुसार, अशा महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!