Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्राच्या लोककलेचा अपमान! तमाशा मंडळातील महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, कपडेही फाडले

महाराष्ट्राच्या लोककलेचा अपमान! तमाशा मंडळातील महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, कपडेही फाडले

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार परिसरात तमाशा मंडळातील कलाकारांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळातील पुरुष आणि महिला कलाकारांना लक्ष्य करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून हा वाद उफाळला. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी इतरांना बोलावून घेत कलाकारांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीत अनेक कलाकार जखमी झाले असून महिलांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. काही महिलांचे कपडे फाडल्याचाही आरोप आहे.

या घटनेत महेश नारायणगावकर यांनाही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!