पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.
सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, विभाग प्रमुख या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सांगली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, विभाग प्रमुख.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : सांगली.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 24 मार्च 2026.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० दिवस (०२ एप्रिल २०२६) .
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड; सांगली., मुख्य कार्यालय, 404, खानभाग, सांगली – 416 416
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sangliurban.bank.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


