Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jat Black Magic: जतमध्ये निकालापूर्वीच काळी जादू; मडकं, लिंबू, हळद-कुंकू अन् उमेदवारांची नावं आढळली

Jat Black Magic: जतमध्ये निकालापूर्वीच काळी जादू; मडकं, लिंबू, हळद-कुंकू अन् उमेदवारांची नावं आढळली

सांगली : राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया संपन्न झाली असून उर्वरीत पुढे ढकलण्यात आलेल्या जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, 21 डिसेंबर रोजी सर्वच निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, महाराष्ट्राचे आणि सर्वच उमेदवारांचे, कार्यकर्त्यांचे लक्ष 21 डिसेंबरकडे लागले आहे. निकालाअगोदर ईव्हीएम स्ट्राँगरुम बाहेर कडा पहारा उमेदवारांकडून, राजकीय पक्षांकडून देण्यात येत आहे. तर, उमेदवारांची धाकधूकही वाढल्याचं दिसून येतं. मात्र, सांगली जिल्ह्यातील जतमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या नावाने अघोरी, काळ्या जादूचा प्रकार केल्याचं पाहायला मिळल्याने खळबळ उडाली आहे.

जत शहरातील निगडी रोड प्रभाग क्र 4 च्या रेणुका नगर येथील रस्त्यालगत एक हिरव्या रंगाचे कापड, एक मडके, दोन बाहुल्या, दोन लिंबू, हळद कंकू आणि गुलाल टाकल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, त्याच मडक्यामध्ये हिरव्या शाईने भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.रवींद्र आरळी, महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार सुजय (नाना) शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे सलीम गवंडी यांची नावे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एका अंतरावर दुसऱ्या एका हिरव्या कपड्यात आणखी एक मडके आढळून आले. त्या मडक्यामध्ये प्रभाग 4 मधील चार महिला नगरसेविका पदाच्या उमेदवारांची नावे आहेत. तर भाजपच्या नगरसेविकापदाच्या उमेदवाराचे नाव नसल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

मडक्यांमध्ये अजित पवारांच्या उमेदवारांची नाव नाही

जतमधील सदर घटनेमुळे परिसरासह शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून 2 डिसेंबरला मतदान घेण्यात आले. मात्र, 3 डिसेंबर रोजीचा निकाल, 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचीकार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. त्यातच, काळ्या जादूच्या प्रकारात, आढळून आलेल्या मडक्यांमध्ये शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे यांचे नाव नसल्याने शहरातील राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, हे मडके कोणी ठेवले, ही काळी जादू कोणी ठेवली याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!