Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Viral Video: फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांना महिलेचा ‘पुणेरी दणका’; नमस्कार करत केली आरती

Pune Viral Video: फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांना महिलेचा ‘पुणेरी दणका’; नमस्कार करत केली आरती

Pune Viral Video : पुण्यातील पाषाण परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना एका महिलेने दिलेला अनोखा ‘पुणेरी धडा’ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. रस्त्यावरची कोंडी टाळण्यासाठी फुटपाथला पर्याय म्हणून वापरणाऱ्या वाहनचालकांना या महिलेने ज्या पद्धतीने सुनावले, ते पाहण्यासाठी अनेकांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला.

फुटपाथवरून जाणाऱ्यांची केली हात जोडून ‘आरती’

पाषाणमध्ये झालेल्या वाहतूककोंडीनंतर काही दुचाकीस्वारांनी थेट फुटपाथवरून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही गोष्ट पाहताच एका महिलेने त्यांच्या समोर हात जोडले आणि “या, तुमची आरती ओवाळते” अशा उपहासात्मक शैलीत त्यांना नियमभंगाची जाणीव करून दिली. फुटपाथवरून जात असलेल्या प्रत्येक दुचाकीस्वाराच्या मागे ती महिला काही अंतरापर्यंत धावताना व्हिडिओत दिसते.

हेही वाचा –‘पुणेकरांना पाणी देणार, पण…’; राधाकृष्ण विखे पाटीलांनी अधिवेशनात उपस्थित केला महापालिकेच्या थकबाकीचा मुद्दा

खोचक टोला आणि योग्य धडा?

दरम्यान, पुणेकरांचे वैशिष्ट्य असलेली खोचक टिप्पणी या प्रसंगातही पाहायला मिळाली. फुटपाथचा गैरवापर करणाऱ्या वाहनचालकांना तिच्या या कृतीने सार्वजनिकरित्या नियमांचे महत्त्व समजण्याचा संदेश दिला. अनेकांनी याला ‘पुणेरी दणका’ म्हणत पाठिंबा दिला तर काहींनी ही पद्धत अतिशयोक्त असल्याचीही प्रतिक्रिया दिली.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, पाषाण परिसरातील हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटिझन्सकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी वाहतुकीचे नियम कडकपणे पाळावेत, असे म्हटले तर काहींनी महिलेची धाडसपूर्ण कृती कौतुकास्पद असल्याचे सांगितले. या घटनेनंतर फुटपाथवरून वाहन चालवणाऱ्या नियमभंग करणाऱ्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!