Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pimpri-Chinchwad: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल; तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीच्या अनुशंगाने विशेष नियोजन

Pimpri-Chinchwad: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल; तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीच्या अनुशंगाने विशेष नियोजन

Pimpri-Chinchwad: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील तुळजाभवानी मंदिरात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने परिसरात मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सांगवी वाहतूक विभागाने विशेष नियोजन केलं असून, आज संध्याकाळी काही प्रमुख मार्ग बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केली आहे.

संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू राहील. विशेषतः बँक ऑफ महाराष्ट्र पिंपळे गुरव चौकातून तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा रस्ता हा पूर्णतः बंद राहणार आहे. या मार्गावरून कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या मार्गाचे नियोजन आधीच करून ठेवावं, असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे.

याशिवाय, सृष्टी चौकातून तुळजाभवानी मंदिरासमोरून भैरवनाथ कमानीकडे जाणारा रस्ताही मिरवणुकीच्या कालावधीत बंद राहणार आहे. या दोन्ही मार्गांवरील बंदोबस्तासाठी वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांचे पथक तैनात केले जाणार आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र चौकातून उजवीकडे वळून काशी विश्वेश्वर चौकामार्गे वाहनचालक पुढे जाऊ शकतात. तसेच सृष्टी चौकातून सरळ 60 फुटी रोडने रामकृष्ण मंगल कार्यालय चौकामार्गे पुढे जाण्याची सोय करण्यात आली आहे.

मिरवणुकीदरम्यान वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगवी वाहतूक विभागाने विशेष पथक तयार केलं आहे. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. वाहनांची सुलभ हालचाल व्हावी व भाविकांना विसर्जन मिरवणुकीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!