Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Supriya Sule : ‘शांत बसणार नाही…उपोषण करू, आंदोलन छेडू’! धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात कमबॅकच्या शक्यतेवर सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule : ‘शांत बसणार नाही…उपोषण करू, आंदोलन छेडू’! धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात कमबॅकच्या शक्यतेवर सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule On Dhananjay Munde: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या खळबळजनक घडामोडी घडत आहेत. नाशिकच्या जिल्हासत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार, दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली असून त्यांना मंत्रिपदावरूनही पायउतार व्हावे लागले आहे.

कोकाटे यांची आमदारकी रद्द होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पावले उचलली आहेत. कोकाटे यांच्याकडील ‘क्रीडा व युवक कल्याण’ आणि ‘अल्पसंख्याक विकास व वक्फ’ ही खाती काढून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या पत्राची दखल घेत राज्यपालांनी बुधवारी रात्री या बदलांवर स्वाक्षरी केली.

सुप्रिया सुळे आक्रमक :

दरम्यान, कोकाटे यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या मंत्रिपदावर आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या शक्यतेमुळे शरद पवार गट कमालीचा आक्रमक झाला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. “ज्या नेत्यावर गंभीर आरोप झाले आहेत, अशा धनंजय मुंडेंना गृहमंत्री अमित शाह भेट कशी काय देतात? याचे मला वाईट वाटते,” असे सुळे यांनी म्हटले.

आरोपांमध्ये तथ्य असल्याशिवाय सरकारने त्यांचा आधी राजीनामा घेतला होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “जर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले, तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही बीडमध्ये जाऊन उपोषण करू आणि राज्यभर तीव्र आंदोलन छेडू,” असा सज्जड दम सुळे यांनी सरकारला दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!